Pani Puri and Cancer Saam Tv
लाईफस्टाईल

Pani Puri and Cancer: खळबळजनक! पाणीपुरी खाल्ल्याने खरंच कॅन्सर होतो का? काय आहे व्हायरल VIDEO मागचं सत्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई, Vinod Patil

पाणीपुरी आवडीने खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण पाणीपुरीमुळे भयंकर अशा कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.अनेकजण आवडीने पाणीपुरी खातात. त्यामुळे ही बातमी पाहून भीती निर्माण झालीय.पाणीपुरीबाबत काय दावा करण्यात आलाय पाहुयात.

कॉटन कँडी(cotton-candy) कोबी मंच्युरियन आणि कबाबनंतर आता लोकप्रिय स्ट्रीट फूड, पाणीपुरीमुळेही कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचं आढळून आलंय. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाला त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये विशेषतः सॉस आणि गोड करी पावडरमध्ये कार्सिनोजेनिक पदार्थ असल्याचे संकेत मिळाले आहेत. कर्नाटकमध्ये जमा करण्यात आलेल्या सुमारे ४०० नमुन्यांपैकी २२ टक्के नमुने दूषित असल्याची नोंद करण्यात आलीय.

हा मेसेज व्हायरल झाल्याने याची पडताळणी करणं गरजेचं आहे. पाणीपुरीमध्ये(pani-puri) काय वापरलं जातं. त्यामुळे खरंच कॅन्सरचा धोका होऊ शकतो का हे तज्ज्ञ सांगू शकतात. त्यामुळे आमच्या टीमने तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतली...

डॉ. कल्याण गंगवाल, वैद्यकीय तज्ज्ञ

व्हायरल सत्य

पाणीपुरीमध्ये कलरिंग एजंट म्हणून केमिकल (chemical)वापरली जातात

कलरिंग एजंट कार्सोजेनिक म्हणजेच कॅन्सरसाठी पोषक असतात

पाणीपुरी विक्रेत्यांना देखील या कलरिंग एजंटची माहिती नसते

फक्त पाणीपुरीच नाही तर, हॉटेलमधील पदार्थ, मिठाईत कार्सोनेजेनिक कलरिंग एजंट वापरतात

कलरिंग एजंट बरोबरच, पदार्थांना चव येण्यासाठी अजिनोमोटो वापरले जाते

अजिनोमोटोदेखील आरोग्यास धोकादायक असून त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो

भारतात हृदयविकार (heart-attack)आणि कॅन्सरचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे आपण जास्त काळजी घेण्याची गरज आहे.मुंबईत पाच हजारांहून अधिक तर महाराष्ट्रात २२ हजार पाणीपुरी विक्रेते असल्याचे सांगण्यात आलंय. बंगळुरमधील ४९ ठिकाणांसह कर्नाटकातील विविध ठिकाणांहून पाणीपुरीचे नमुन्यात हानिकारक अन्नपदार्थ असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे पाणीपुरी खाताना काळजी घ्या.नाहीतर तुमचं आरोग्य धोक्यात आलंच समजा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

SCROLL FOR NEXT