Tea and cholesterol saam tv
लाईफस्टाईल

Tea and cholesterol: चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? डॉक्टरांनी सांगितलं कोणी पिऊ नये चहा

Tea and LDL cholesterol: चहा प्यायल्याने थेट LDL कोलेस्ट्रॉल वाढतं का? दूध, साखर आणि चहाच्या प्रकाराचा कोलेस्ट्रॉलवर कसा परिणाम होतो, हे जाणून घ्या. हाय कोलेस्ट्रॉल असल्यास चहा पूर्णपणे बंद करावा का, तसेच ब्लॅक टी आणि ग्रीन टीबाबत महत्त्वाची माहिती वाचा.

Surabhi Jayashree Jagdish

चहाचे चाहते आपल्या आजूबाजूला सहज पाहायला मिळतात. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच्या धावपळीत थोडा ब्रेक घ्यायचा असो अनेकांना चहाचा कप हवाच असतो. मात्र चहा पिण्याबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात. चहामुळे अॅसिडिटी होते, जास्त साखर घेतल्याने रक्तातील साखर वाढू शकते असं आपण अनेकदा ऐकतो. पण चहा प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल वाढतं का? कोलेस्ट्रॉल आधीच जास्त असेल तर चहा पूर्णपणे बंद करावा का, असा प्रश्नही अनेकांना पडतो.

दूध घातलेला चहा कोलेस्ट्रॉल वाढवतो?

एका वेबसाईटला माहिती यासंदर्भात माहिती देताना मेदांता मेडिसिटी मूलचंद हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ. तरुण कुमार यांनी सांगितलं की, साधारण चहा प्यायल्याने थेट बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं असं म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं असंही नाही.

चहामध्ये फुल-फॅट म्हणजेच जास्त फॅट असलेलं दूध आणि भरपूर साखर वापरली जात असेल तर हा प्रकार नियमितपणे केल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरी आणि फॅटचं प्रमाण वाढू शकतं. कालांतराने वजन वाढणं आणि शरीरातील अतिरिक्त चरबी वाढणं यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे म्हणूनच कोलेस्ट्रॉलचा त्रास असलेल्या व्यक्तींनी फक्त ‘चहा’ पाहण्यापेक्षा चहामध्ये काय आणि किती प्रमाणात घातलं जातं, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

ब्लॅक टी की दूध घातलेली चहा?

डॉ. तरुण कुमार यांच्या मते, दूध आणि साखर घातलेल्या चहापेक्षा ब्लॅक टी किंवा ग्रीन टी हा तुलनेने चांगला पर्याय ठरू शकतो. दूध आणि साखरेचा वापर कमी केल्यामुळे अतिरिक्त कॅलरी आणि फॅटचं प्रमाणही कमी ठेवता येते.

चहा प्यायची सवय असेल तर ब्लॅक टी किंवा ग्रीन टीचा पर्याय निवडता येऊ शकतो. या चहामध्ये नैसर्गिक स्वरूपात काही अँटिऑक्सिडंट घटक असतात. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत त्यांचा आहारात मर्यादित प्रमाणात समावेश केला जाऊ शकतो. ग्रीन टी किंवा ब्लॅक टीमुळे रक्तातील साखरेचं नियंत्रण आणि हृदयाच्या आरोग्यासाठी काही फायदे होऊ शकतात. मात्र त्यांना कोणत्याही आजारावरील उपचाराचा पर्याय मानता येणार नाही.

कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर चहा पूर्णपणे बंद करायचा का?

कोलेस्ट्रॉल वाढलं आहे म्हणून प्रत्येकाने चहा पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे असं नाही. मात्र चहाचं प्रमाण त्यामध्ये वापरलेलं दूध आणि साखर यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. विशेषतः दिवसातून अनेक वेळा चहा पिण्याची सवय असेल आणि प्रत्येक कपात भरपूर साखर आणि फुल-फॅट दूध वापरलं जात असेल तर ही सवय कमी करणे फायदेशीर ठरू शकतं. त्याऐवजी कमी फॅटचं दूध, कमी साखर किंवा शक्य असल्यास साखर न घालता चहा घेण्याचा पर्याय निवडता येतो.

या लोकांनी चहा पिताना काळजी घ्यावी

डॉ. तरुण कुमार सांगतात की, पोटाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब किंवा रात्री झोप न लागण्याची समस्या असेल तर चहा घेण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. चहामध्ये कॅफीन असल्याने काही व्यक्तींना त्याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. विशेषतः रात्री उशिरा चहा घेतल्यास काही लोकांची झोप बिघडू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींनी चहाची वेळ आणि प्रमाण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

फक्त चहा बदलणं पुरेसं नाही

कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे केवळ चहा हे एकमेव कारण नाहीये. आहारातील जास्त सॅच्युरेटेड फॅट, वजन वाढणं, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, आनुवंशिक कारणं आणि इतर काही आरोग्यविषयक कारणांमुळेही कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास फक्त चहा बंद करण्याऐवजी संपूर्ण आहाराकडे लक्ष देणं, नियमित व्यायाम करणं, वजन नियंत्रणात ठेवणं आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या व उपचार नियमितपणे घेणं महत्त्वाचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्ही खात असलेले मसाले, चहा पावडर सुरक्षित आहे का? एक्स्पायरी डेट बदलण्याचा काळाबाजार उघड

Maharashtra News Live Update: सरकारचे शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ₹14.10 लाख? 8व्या वेतन आयोगाचं संपूर्ण गणित समजून घ्या

Mandwa Gateway Of India Ferry : आता अलिबाग फक्त 'इतक्या' मिनिटांत! गेटवेपासून बोट सेवा पुन्हा सुरु; पाहा नवी वेळ आणि तिकीट

Fruit Juice And Blood Sugar: फळांचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT