भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्यक्ष भेटीगाठी, दूरध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थान येथे दर्शन घेऊन रविंद्र चव्हाण यांनी वाढदिवसाची सुरुवात केली. त्यानंतर ‘जननी आशिष’ अनाथाश्रम, ‘आपलं घर’ वृद्धाश्रम यांसह 'डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी' या संस्थांना सहकुटुंब भेट देत तेथील नागरिक आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला.
‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’च्या स्नेहसंमेलनात भगिनींकडून औक्षण करण्यात आले आणि नागरिकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयांमध्ये अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी रविंद्र चव्हाण यांचे औक्षण केले, तसेच भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वयंसेवक, भाजप परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिकांनी रविंद्र चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी, युवा सहभाग आणि ज्येष्ठांचा सन्मान यांचा सुरेख संगम साधत रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकी ही जनसेवेच्या कार्यासाठी आणखी बळ देणारी असल्याची प्रतिक्रिया रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.