Heart Attack Risk Google
लाईफस्टाईल

Heart Attack Risk: सावधान! फिटनेसच्या नादात घेताय सप्लिमेंट्स? वाढेल स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका

Liver Failure: प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञांचा इशारा दिला आहे. व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्सचं अति सेवन हृदय व लिव्हरसाठी घातक आहे. योग्य सल्ल्याशिवाय घेतलेले सप्लिमेंट्स तरुणांनाही हार्ट अटॅकचा धोका निर्माण करतात.

Sakshi Sunil Jadhav

सप्लिमेंट्सचे अतिप्रमाणात सेवन हृदय आणि लिव्हरसाठी धोकादायक असते.

नायसिन (Vitamin B3) आणि ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट अति घेतल्यास गंभीर परिणाम होतात.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स घेणे टाळावे.

बऱ्याच जणांना सवय असते की सर्दी खोकला अशा सामान्य वाटणाऱ्या आजारांवर लोक त्यांच्या मनाने औषधे घेतात. अनेकजण शरीर तंदुरुस्त राहावं, त्वचा आणि केस सुंदर राहावेत यासाठी विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि सप्लिमेंट्स घेत असतात. मात्र हेच सप्लिमेंट्स जर अति प्रमाणात घेतले तर ते शरीरासाठी घातक ठरू शकतात असा इशारा प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. इव्हान लेविन यांनी दिला आहे.

न्यूयॉर्कमधील माउंट सायनाय हॉस्पिटलचे हृदय तज्ज्ञ डॉ. लेविन यांनी सांगितले की, काही व्हिटॅमिन आणि प्लांट-बेस्ड सप्लिमेंट्स दीर्घकाळ घेतल्यास हार्ट आणि लिव्हरवर गंभीर परिणाम होतो. अशा काही जेल कॅप्सूल्स हृदयाच्या कार्यावर परिणाम करून स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात.

सीडीसीच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी ८ लाखांहून अधिक अमेरिकन नागरिकांना हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा सामना करावा लागतो. २०२० मध्ये जवळपास १.३८ लाख लोक स्ट्रोकमुळे मृत्यूमुखी पडले. विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात तरुण वयोगटातील लोकांनाही हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. तसेच, सुमारे ५ मिलियन अमेरिकन नागरिकांना लिव्हर डिसीजचा त्रास असून दरवर्षी जवळपास ६०,000 लोक लिव्हर फेल्युअरमुळे मृत्यूमुखी पडतात.

तज्ज्ञांनी सांगितले की, नायसिन Vitamin B3 हे असे एक सप्लिमेंट आहे जे अति प्रमाणात घेतल्यास हार्ट आणि लिव्हर दोघांनाही हानी पोहोचवू शकते. नायसिन शरीराच्या ऊर्जा उत्पादनात आणि स्नायू, त्वचा, पचन या कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. लाल मांस, मासे, ब्राउन राईस, ड्रायफ्रूट्स आणि केळी यांसारख्या पदार्थांमध्ये हे व्हिटॅमिन नैसर्गिकरित्या मिळते. मात्र, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी किंवा संधिवाताच्या उपचारांसाठी डॉक्टरांकडून याचे सप्लिमेंट स्वरूपात सेवन केलं जातं.

दररोज ८०० मिग्रॅ किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट घेणे धोकादायक ठरू शकते. विशेषतः ज्यांना हृदयाचे आजार, मधुमेह, अ‍ॅनिमिया, रक्तस्रावाचा त्रास किंवा आधीपासून लिव्हरची समस्या आहे, त्यांनी अशा सप्लिमेंट्सपासून दूर राहावे.

डॉ. लेविन यांच्या या इशाऱ्यामुळे आता आरोग्यप्रेमींनी सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. कारण योग्य माहितीशिवाय घेतलेले सप्लिमेंट्स आरोग्य सुधारण्याऐवजी हृदय आणि लिव्हरला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात.

सप्लिमेंट्स घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?

काही व्हिटॅमिन्स आणि प्लांट-बेस्ड सप्लिमेंट्स रक्तदाब आणि हार्ट फंक्शनवर परिणाम करतात, ज्यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

लिव्हर फेल्युअर कसा होतो?

नायसिन आणि ग्रीन टी एक्स्ट्रॅक्टचे जास्त सेवन केल्यास लिव्हर पेशींचे नुकसान होऊन फेल्युअर होऊ शकते.

कोणत्या लोकांनी अशा सप्लिमेंट्स खाणे टाळावे?

हृदयाचे आजार, मधुमेह, रक्तस्राव किंवा लिव्हर समस्या असलेल्यांनी अशा सप्लिमेंट्सपासून दूर राहावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panhala History: सह्याद्रीच्या वैभवात महाराष्ट्राचे ऐतिहासिक रत्न, पन्हाळा गडाचा इतिहास

Weight Gain: झोपेच्या अभावामुळे वजन वाढते? जाणून घ्या कारण

Shaniwar Wada Namaz Row : भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक होणार? पुण्यातील शनिवारवाडा प्रकरण तापलं

Isha Malviya: स्टाइल जो दिल जीत ले! ईशा मालवीयाचा ट्रेंडी एथनिक लूक

मतदार यादीमध्ये बोगस नावं कोणी टाकली? आरोपानंतर आमदार गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT