Sakshi Sunil Jadhav
गुलगुले हे गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून पारंपारिक भारतीय स्वीट डीश आहे. गुलगुले आतून मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत असतात.
तुम्हाला चहासोबत नाश्त्याला काय बनवायचं हे सुचत नसेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. ही पदार्थ पुर्वी पासून दिवाळीसारख्या सणांमध्ये आवर्जून केला जातो.
गव्हाचे पीठ, बारिक साखर, वेलची पूड, पिकलेले केळ, पाणी, बडीशेप, पाणी, तेल इ.
साखर कोमट पाण्यात विरघळवून घ्या. पाण्याचा पाक व्यवस्थित तयार करा. जास्त घट्ट नसला तरी चालेल.
गव्हाचे पीठ, वेलची पूड, बडीशेप आणि मॅश केलेले केळं यांचे मिश्रण तयार करा. मिश्रण घट्ट ठेवा.
आता लो फ्लेमवर तेल गरम करा. कढईचाच वापर करा.
आता तेल व्यवस्थित झाल्यावर त्यात एक चमचा पीठ टाका आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या.
टिश्यू पेपरवर काढून गरम गरम सर्व्ह करा. चहासोबत सर्वात टेस्टी लागेल.