Protein Powder Side Effects saam tv
लाईफस्टाईल

Protein Powder: रोज प्रोटीन पावडर घेताय? जाणून घ्या त्याचे दीर्घकालीन परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

Protein Powder Side Effects: काहींना असं वाटतं की केवळ सप्लीमेंट्सच्या माध्यमातून आपण प्रोटीन घेऊ शकतो. यासाठी ते अतिप्रमाणात प्रोटीनचं सेवन करतात. मात्र तुम्हाला माहितीये का, असं करणं धोकादायक ठरू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

फीट राहण्यासाठी आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते. यासाठी आपण आहार किंवा पावडर यांच्यामार्फत प्रोटीन घेतो. मात्र काहींना असं वाटतं की केवळ सप्लीमेंट्सच्या माध्यमातून आपण प्रोटीन घेऊ शकतो. यासाठी ते अतिप्रमाणात प्रोटीनचं सेवन करतात. मात्र तुम्हाला माहितीये का, असं करणं धोकादायक ठरू शकतं.

किती प्रमाणात प्रोटीन घ्यावं?

ज्या व्यक्ती जीममध्ये जातात त्यांना ट्रेनर प्रोटीनचं प्रमाण सांगतात. मात्र जर तुम्ही हेवी वर्कआऊट करत नसाल किंवा तुमच्या शरीराची जास्त हालचाल देखील नसेल तर प्रत्येक दिवशीच्या वजनानुसार ०.८-०.९ ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. चांगली जीवनसत्त्वं, खनिजे, फायबर आणि चांगली फॅट्स या गोष्टी तुम्ही चांगल्या आहाराद्वारे देखील मिळवू शकता. त्यासाठी प्रोटीन पावडरची गरज नाही.

आवश्यक पोषक घटकांचा पावडरमध्ये अभाव

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोषक घटक आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. यामध्ये टोफू, चिकन, मासे, अंडी, सुकामेवा, बिया यांचा समावेश होते. नियमित यांचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला योग्य प्रमाणात पोषक घटक मिळू शकतात. हे पोषक घटक पावडरमध्ये नसतात. त्यामुळे तुम्हाला पावडरमधून या गोष्टी मिळू शकणार नाहीत.

काय आहेत प्रोटीन पावडरचे दुष्परिणाम?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पावडरमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. या प्रोटीनचं सेवन केल्याने तुमच्या किडनीवर त्याचा ताण येतो. परिणामी युरियातून जास्तीचं नायट्रोजन उत्सर्जित करणं कठीण होतं. यामुळे किडनी स्टोन, अॅलर्जी, पुरळ येणं हे त्रास होऊ शकतात. याशिवाय आतड्यांमधील बॅक्टेरियासुद्धा बदलून आतड्यांशीसंबंधित आजार होण्याचा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT