Men thyroid test: पुरुषांनी थायरॉईड चाचणी करावी का? दररोज दिसणाऱ्या 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञांचा सल्ला

Should men take thyroid test signs experts : मानेमध्ये असलेली थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय, ऊर्जा उत्पादन आणि हार्मोनल संतुलन यासारख्या आवश्यक कार्यांचे नियमन करते.
Men thyroid test
Men thyroid testSAAM tv
Published On

महिलांमध्ये थायरॉईड विकार होणं हे जरी सामान्य असलं तरी पुरुषांना हा त्रास होणारच नाही असे नाही. मानेमध्ये असलेली थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय, ऊर्जा उत्पादन आणि हार्मोनल संतुलन यासारख्या आवश्यक कार्यांचं नियमन करतं. ज्यावेळी ही ग्रंथी कमी सक्रिय असते (हायपोथायरॉईडीझम) किंवा अति सक्रिय असते (हायपरथायरॉईडीझम), तेव्हा पुरुषांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थायरॉईडचे वेळीच निदान आणि उपचार करणे आवश्यक ठरते.

न्यूबर्ग अजय शाह लेबोरेट्रीचे डॉ. अजय शाह यांनी सांगितलं की, जर पुरुषांना विनाकारण जाणवणारा थकवा, वजन वाढण किंवा कमी होणं, नैराश्य, केस विरळ होणं किंवा हृदयाच्या ठोक्यातील बदल यासारखी लक्षणं जाणवतात त्यांनी थायरॉईड चाचणीचा विचार करावा. स्नायूमधील कमकुवतपणा, कोरडी त्वचा, बद्धकोष्ठता, किंवा थंडी आणि उष्णता सहन न होणं ही थायरॉईड बिघडल्याची लक्षणं आहेत.

Men thyroid test
Blood Sugar Level: नॉर्मल ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? मधुमेहाचा धोका कोणत्या पातळीत मानला जातो?

ज्या व्यक्तींच्या घरात थायरॉईड किंवा ऑटोइम्युन विकाराचा इतिहास आहे किंवा हाय रेडीएशन लेव्हलच्या संपर्कात आलेल्या पुरुषांना याचा जास्त धोका असतो त्यामुळे त्यांनी चाचणी बाबत विशेष आवश्यक आहे.

डॉ. शाह पुढे म्हणाले की, हायपोथायरॉईडीझम असलेल्या पुरुषांची टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते. यावेळी या पुरुषांना प्रजनन विषयक समस्या उद्भवू शकतात. तर हायपरथायरॉईडीझममुळे मूड स्विंग, हृदय धडधडणं आणि निद्रानाश होऊ शकतो. उपचार न केल्यास, थायरॉईड विकारांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, ऑस्टिओपोरोसिस आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

Men thyroid test
High Blood Sugar : गर्भधारणेदरम्यान वाढलेली ब्लड शुगर किती धोकादायक? बाळावर कसा होऊ शकतो परिणाम, तज्ज्ञांनी दिली माहिती

थायरॉईड चाचणी म्हणजे सामान्यतः टीएसएच (थायरॉईड-स्टीम्युलेटींग हार्मोन), T3 आणि T4 चे स्तर मोजण्याची एक साधी रक्त चाचणी असते. काही समस्या आढळली तर डॉक्टर पुढील तपासणी आणि उपचार करण्याचा सल्ला देतात.

Men thyroid test
Erectile Dysfunction: पुरुषांमध्ये वाढतेय इरेक्लाइल डिस्फंक्शनची समस्या; पाहा कोणत्या पुरुषांना याचा अधिक धोका?

सहसा पुरूष थायरॉईड-विषयक लक्षणांचा संबंध वयोमान, ताण याच्याशी लावून एकतर त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा फेटाळून लावतात. दीर्घकालीन आजार टाळण्यासाठी तसेच निरोगी राहण्याच्या दृष्टीने थायरॉईड चाचणीसह नियमित आरोग्य तपासण्या करून घेणं आवश्यक आहे.

Men thyroid test
ज्येष्ठ नागरिकांनी 'या' आरोग्याच्या चाचण्या केल्याच पाहिजेत; वेळीच जाणून घ्या

सुरुवातीची लक्षणं लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ला घेतल्यास पुरुष त्यांच्या थायरॉईड विकारांची योग्य काळजी घेऊ शकतील तसेच त्यांचे आरोग्यमान सुधारेल. संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तुमचे थायरॉईड आरोग्य तुमच्या आरोग्याच्या इतर कोणत्याही पैलू इतकेच महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com