
मधुमेह झाला की त्यातून बाहेर पडायचं हा प्रश्न प्रत्येकाला असतो. गरोदरपणात देखील महिलांना मधुमेहाची लागण होते. एखाद्या गरोदर स्त्रीला मधुमेह असेल तर बाळासाठी तिला खूपच काळजी घ्यावी लागते. यामध्ये खाण्यापिण्यावर बंधनं येतात. गर्भावस्थेत वाढलेली साखर किती धोकादायक असू शकते हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय.
पुण्याच्या मदरहूड हॉस्पिटलमधील स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ. स्वाती गायकवाड म्हणाल्या की, शरीरातील इन्सुलिन हार्मोनसच्या कार्यात बिघाड झाल्यास मधुमेह जडतो. गरोदरपणाच्या काळात जडणार्या मधुमेहाला जेस्टेशनल डायबिटिज म्हणतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे गर्भाशयात बाळाची वाढ प्रमाणापेक्षा जास्त होते व त्यामुळे गर्भारपणात त्रासाचे होऊ शकते किंवा नैसर्गिक प्रसूती शक्य नसते. मातेला जंतुसंसर्ग होण्याचा धोका वाढतो.
पहिला प्रकार म्हणजे गरिभधारणेपुर्वीचा मधुमेह आणि दुसरा प्रकार म्हणजे साधारणत: सातव्या महिन्यात होणारा मधुमेह (Gestational Diabetes). स्त्रियांमध्ये बहुतांशी दुसऱ्या प्रकारचा मधुमेह दिसून येतो.
डॉ. गायकवाड पुढे म्हणाल्या की, गर्भारपणातील मधुमेह हा बाळाच्या जन्मानंतर बहुतेक वेळा ते निघून जातो. भारतात 4-21 टक्के महिलांना गर्भधारणेदरम्यान मधुमेह होतो. जेव्हा साखरेची पातळी योग्य वेळी नियंत्रणात आणली जात नाही तसेच तर गर्भवती महिलेची तसेच गर्भातील बाळाची साखरेची पातळीही वाढते. प्रसूतीच्या वेळी ते दोघांसाठीही धोकादायक ठरते. बाळाच्या मेंदू आणि वाढीसाठी रक्तातील साखर आवश्यक आहे. परंतु गर्भावस्थेतील मधुमेहामुळे बाळांना सुरुवातीला रक्तातील साखरेचे प्रमाण कमी (हायपोग्लाइसेमिया) होऊ शकते.
१. रक्तातील साखर कमी होते
२. हाय रिस्क प्रसूतीमुळे बाळांतपणादरम्यान इजा होण्याची शक्यता असते.
३. श्वसनासंबंधी त्रास सतावणे.
४. कावीळ होणे.
५. रक्तातील लालपेशींचे प्रमाण वाढणे.
६. रक्तातील मॅग्नेशिअम तसेच कॅल्शिअमचे प्रमाण कमी होणे.
७. गर्भावस्थेतील मधुमेहावर वेळीच उपचार न केल्यास
८.अम्नीओटिक द्रवपदार्थ वाढणे.
९.अकाली प्रसुती
१०.बाळाचे वजन जास्त असणे. गरोदरपणातील मधुमेहामुळे बाळाचं वजन वाढतं तसंच प्रसूतीच्या कळा सहन करण्याची ताकद खूपच कमी होते त्यामुळे सिझरियनची शक्यता वाढते. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास बाळाचं डोकं किंवा खांदे अडकून बसल्याने फार मोठा धोका उद्भवू शकतो.
गरोदरपणातील मधुमेहामुळे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला दीर्घकाळासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी गरोदर महिलेने आहाराची विशेष काळजी घ्यावी. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहिल. दोन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा, दर थोड्यावेळाने काही खाणे आवश्यक आहे.
तसंही गरोदरपणात थोड्या-थोड्या वेळाने भूक लागतेच. आहाराबरोबर व्यायामही महत्त्वाचा आहे. व्यायामाने इन्शुलीनचे कार्य सुविहित होते. रोजचे घरकाम हे व्यायाम म्हणून सहसा पुरेसे नसते. गर्भारपणात नियमितपणे स्वतःची तपासणी करत राहा आणि गर्भधारणेतील गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा व स्वमर्जीने औषधोपचार करणे टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.