Surabhi Jayashree Jagdish
एखाद्याला मधुमेह आहे की, नाही हे मेडिकल टेस्ट केल्यानंतरच समजू शकतं.
पण सकाळी उठल्यानंतर अशी अनेक लक्षणं दिसतात जी याची खात्री करतात.
सकाळी उठल्यानंतर तुमच्या शरीरात ही लक्षणं दिसली तर तुम्हाला मधुमेह असल्याचं समजतं.
मधुमेहाचं एक लक्षण म्हणजे कोरडे तोंड. सकाळी उठल्यानंतर तोंड कोरडे पडल्यास आणि पाणी प्यायल्यानंतरही कोरडंच राहत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण आहे.
हात थरथर कापणं आणि घाम येणं ही देखील रक्तातील साखर वाढल्याची सुरुवातीची लक्षणं आहेत. याकडे दुर्लक्ष करू नये.
मधुमेहामुळे दृष्टी धूसर होते. सकाळी उठल्यावर अस्पष्ट दिसलं तर रक्तातील साखरेची पातळी वाढल्याचा अंदाज येतो.
थकवा जाणवणं हे देखील मधुमेहाच्या लक्षणांपैकी एक आहे. सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत असेल तर समजा तुम्हाला मधुमेह असण्याची शक्यता असू शकते.
या ठिकाणी देण्यात आलेल्या गोष्टी सामान्य माहितीच्या आधारावर आहेत. आम्ही याची खातरजमा करत नाही.