Walk As Per Age: वयोमानानुसार तुम्ही किती पावलं चालली पाहिजेत? पाहा संपूर्ण चार्ट

Walk As Per Age: चालणं ही अशी एक्सरसाईज आहे ज्यामध्ये तुमचे संपूर्ण शरीर एक्टिव्ह राहतं. यामध्ये तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग वेगाने काम करतो. चला तर जाणून घेऊया तुम्ही वयोमानानुसार किती प्रमाणात चाललं पाहिजे.
Walk As Per Age
Walk As Per Agesaam tv
Published On

पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी दररोज पायी चालणं तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. चालण्याचे फायदे आपण पाहिले आहेत. चालणं हे निरोगी शरीर आणि मनासाठी खूप फायदेशीर मानण्यात येतं. सर्व वयोगटातील लोकांना दररोज चालण्याचा सल्ला देतात. चालणं ही अशी एक्सरसाईज आहे ज्यामध्ये तुमचे संपूर्ण शरीर एक्टिव्ह राहतं. यामध्ये तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग वेगाने काम करतो.क्

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर तुम्ही नियमित चालत असाल तर तुम्हाला इतर कोणत्याही व्यायामाची फारशी गरज नाही. मात्र तुम्ही किती प्रमाणात चाललं पाहिजे याची तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या वयाच्या व्यक्तीने दररोज किती पावलं चालली पाहिजेत? चला तर जाणून घेऊया तुम्ही वयोमानानुसार किती प्रमाणात चाललं पाहिजे.

स्वीडनमधील कलमार विद्यापीठातील 14 संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीने वय लक्षात घेऊन पायी चालण्याचा सराव केल तर केवळ वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येत नाही तर त्याचे इतर अनेक समस्या नियंत्रणात राहतात. संशोधनाच्या आधारे, एखाद्या व्यक्तीने त्याच्या वयानुसार दररोज किती पावले उचलली पाहिजेत हे जाणून घेऊया.

6 ते 17 वर्षे वयोगटातील मुलं

संशोधनानुसार, 6 ते 17 वर्षे वयोगटातील मुले जेवढी जास्त चालतात, त्यांच्यासाठी ते जास्त फायदेशीर असते. या वयातील मुलांनी दिवसाला किमान १५,००० पावलं चाललं पाहिजे. मुलींनी 12,000 पावलं चालल्यास ते त्यांच्यासाठी फायदेशीर असतं.

Walk As Per Age
Health News: २६% कमी होईल हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका, झोपण्यापू्र्वी केवळ 'या' सवयी सुधारा

18 ते 40 वयोगट

18 ते 40 वयोगटातील स्त्री आणि पुरुष दिवसातून 12,000 पावलं चालणं ठेवलं पाहिजे.

Walk As Per Age
Blood Sugar: जेवल्यानंतर पायी चालल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

वयाच्या ४० नंतर

40 पर्यंत पोहोचल्यानंतर आरोग्याशी संबंधित समस्या अधिक सामान्य असतात. या वयात अनावश्यक वजन वाढण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या वयात दिवसातून 11,000 पावलं चालणं गरजेचं आहे.

Walk As Per Age
Heart Attack Signs: शरीरात होऊ लागले 'असे' बदल तर वेळीच व्हा सावध; हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात

५० वयोगट

50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी दररोज 10,000 पावलं पायी चाललं पाहिजे.

६० वर्षांवरील व्यक्ती

फीटनेस जपण्यासाठी 60 वर्षांच्या लोकांनी दररोज किमान 8,000 पावलं चालणं फायदेशीर आहे.

Walk As Per Age
Blood Sugar Level: नॉर्मल ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? मधुमेहाचा धोका कोणत्या पातळीत मानला जातो?

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com