PCOS आणि थायरॉईडची लक्षणं सारखीच, कसं ओळखायचं तुम्हाला नेमकं काय झालंय? वाचा तज्ज्ञांचं मत

PCOS and Thyroid Diagnosis: आजकाल थायरॉईड आणि पीसीओएस या महिलांमध्ये सामान्य समस्या झाल्या आहेत. पीसीओएस झाल्यानंतर अनेक महिलांना थायरॉईड किंवा हायपोथायरॉईडीझमची समस्या दिसून येते.
PCOS and Thyroid
PCOS and Thyroidsaam tv
Published On

पीसीओएस आणि थायरॉईड यांच्यामध्ये काही संबंध आहे का? पीसीओएस हा थायरॉईडचं कारण बनू शकतो का? आजकाल थायरॉईड आणि पीसीओएस या महिलांमध्ये सामान्य समस्या झाल्या आहेत. पीसीओएस झाल्यानंतर अनेक महिलांना थायरॉईड किंवा हायपोथायरॉईडीझमची समस्या दिसून येते.

मुलुंडच्या फोर्टिस रूग्णालयातील कन्सल्टण्ट एण्डोक्रिनोलॉजिस्ट अँड डायबेटोलॉजिस्ट डॉ. श्वेता बुदयाल यांनी सांगितलं की, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि थायरॉईड हे दोन्ही आजार महिलांमध्ये सामान्य आहेत. उपचार न केलेले हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमध्ये पीसीओएस सारखीच लक्षणं दिसून येऊ शकतात. दीर्घकाळ टिकणारे आणि गंभीर हायपोथायरॉईडीझममध्ये प्रत्यक्षात पीसीओएस सारखीच लक्षणं दिसून येऊ शकतात आणि हायपोथायरॉईडीझमवर उपचार केल्याने सर्व लक्षणं कमी होऊ शकतात.

PCOS and Thyroid
Men thyroid test: पुरुषांनी थायरॉईड चाचणी करावी का? दररोज दिसणाऱ्या 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञांचा सल्ला

पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये, योग्यरित्या नियंत्रित नसलेलं थायरॉईड आजारांमुळे त्यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे हायपोथायरॉईडीझममुळे वजन वाढू शकते आणि इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो. ज्यामुळे पीसीओएस आणखी खालावू शकतो. म्हणून, पीसीओएस असल्याचा संशय असल्यास महिलांनी थायरॉईड आजार आणि प्रोलॅक्टिनचे निदान करण्यासाठी चाचणी करावी, असंही डॉ. श्वेता म्हणाल्या.

PCOS and Thyroid
Sleep hours by age: तुमच्या वयोमानानुसार तुम्ही किती तास झोप घेतली पाहिजे?

न्यूबर्ग अजय शाह लेबोरेट्रीचे डॉ. अजय शाह यांनी सांगितलं की, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) आणि थायरॉईड हे दोनही विकार अनेकदा एकत्र असतात. ज्यामुळे अनेक महिलांच्या हार्मोनल आणि प्रजनन आरोग्यावर परिणाम होतो. दोन्ही विकार हार्मोनल असंतुलनाशी संबंधित असल्याने वजन वाढणं, मासिक पाळीमधील अनियमितता, केस गळणे आणि वंध्यत्व यांसारखी दोन्ही मध्ये आढळणारी लक्षणं जाणवतात ज्यामुळे निदान आणि उपचार थोडं आव्हानात्मक बनतं.

PCOS and Thyroid
कॅन्सरच्या Stage 0 मध्ये शरीरात होतात 'हे' बदल, वेळीच लक्षणं ओळखा

हायपोथायरॉईडीझम, पीसीओएसशी संबंधित सर्वात सामान्य थायरॉईड विकार, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढतो पर्यायाने मासिक पाळीत व्यत्यय येऊन गर्भाशयाचं बिघडलेलं कार्य अजूनच बिघडवून पीसीओएसची लक्षणे वाढवू शकतो. हायपोथायरॉईडीझममध्ये थायरॉईड-स्टीम्युलेटींग हार्मोन्स (टीएसएच) च्या वाढलेल्या स्तरामुळे गर्भाशयातील अँड्रोजन उत्पादन वाढू शकते परिणामी मुरुमं आणि केसांची अतिरिक्त वाढ यांसारख्या पीसीओएस संबंधित समस्या तीव्र होतात.

PCOS and Thyroid
Uterine cancer: गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत महिलांमध्ये अजूनही आहेत 'हे' गैरसमज; तज्ज्ञांनी सांगितली खरी वास्तविकता काय

डॉ. शाह यांनी पुढे सांगितलं की, याउलट, हायपरथायरॉईडीझम मध्ये पीसीओएसशी साधर्म्य दाखविणारी लक्षणं दिसू शकतात. ज्यामुळे चुकीचे निदान होण्याची शक्यता असते. या संबंधामुळे, पीसीओएसचे निदान झालेल्या महिलांनी थायरॉईडच्या सह-अस्तित्वात असलेल्या समस्या नसल्याची खातरजमा करण्यासाठी किंवा त्यांवर उपाययोजना करण्यासाठी थायरॉईड फंक्शन चाचण्या कराव्यात. जीवनशैलीतील बदल, औषधे आणि नियमित देखरेखीद्वारे दोन्ही आजार एकाच वेळी हाताळल्याने एकूण आरोग्य आणि प्रजनन परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com