Surabhi Jayashree Jagdish
कॅन्सरच्या ४ टप्प्यांबाबत तुम्हाला माहिती असेल. मात्र स्टेज ० बाबत तुम्ही ऐकलंय का?
स्टेज 0 कॅन्सर, ज्याला कार्सिनोमा इन सिटू (CIS) देखील म्हणतात, ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पेशी प्रथम ज्या भागात तयार होतात त्या भागात मर्यादित असतात
कॅन्सरच्या या स्टेजमध्ये काय लक्षणं दिसून येतात हे पाहूयात.
कर्करोगाच्या पेशींना जास्त ऊर्जा लागते, ज्यामुळे शरीरात जास्त कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे वजन कमी होते.
हाडांच्या कॅन्सरमुळे सुरुवातीपासूनच वेदना होऊ शकतात. मेंदूतील ट्यूमरमुळे सतत डोकेदुखी होऊ शकते जी उपचार करूनही दूर होत नाही.
या स्टेजमध्ये त्वचेवर डाग येणं, खाज सुटणं, रंग बदलणं अशा गोष्टी दिसून येतात.
कर्करोगामुळे रक्त त्या ठिकाणी दिसू शकते जेथे ते सामान्यपणे दिसत नाही.
कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला खूप थकवा जाणवणे हे कर्करोगाचे प्रमुख लक्षण आहे.