Mouth Ulcers freepik
लाईफस्टाईल

Mouth Ulcers: तुम्हालाही उन्हाळ्यात तोंड येण्याचा त्रास होतो का? करा 'हे' सोपे उपाय

Mouth Ulcer Relief: जर तुम्हालाही ही समस्या वारंवार होत असेल, तर घाबरण्याची आवश्यकता नाही. हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय तुमच्या तोंड येण्याच्या समस्येतून लवकरच आराम देतील.

Dhanshri Shintre

उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश, शरीरातील वाढलेली उष्णता, पोषणाचा अभाव किंवा डिहायड्रेशनमुळे तोंड येणे सामान्य आहे. या समस्येमुळे केवळ वेदना होतातच, तर खाण्याची आणि पिण्याचीही समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल, तर घाबरण्याची गरज नाही. हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय तुमच्या तोंड येण्याच्या समस्येपासून लवकरच आराम देऊ शकतात. तुम्ही हे उपाय करून सहज आराम मिळवू शकता.

१. मध आणि वेलची

मध आणि वेलचीचा थंडावा आणि बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारा प्रभाव तोंड येणे लवकर बरे करण्यास मदत करतो.

कसे वापरायचे?

- थोडेसे मध घ्या त्यात वेलचीची पावडर टाका.

- हे मिश्रण जिथे तोंड आलं आहे तेथे लावा आणि ५ ते १० मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धूवून घ्या.

- हा उपाय दिवसातून २-३ वेळा केल्याने लवकरच आराम मिळेल.

२. नारळ तेल

नारळ तेलाच्या दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्मांमुळे अल्सर लवकर बरे होतात आणि जळजळ कमी होते.

कसे वापरायचे?

- तुमच्या हाताच्या बोटावर थोडेसे खोबरेल तेल घ्या. हे तेल तोंड आलेल्या ठिकाणी लावा. असे दिवसातून २-३ वेळा करा. तुम्हाला लवकर आराम मिळेल.

३. तुळशीची पाने

तुळस त्याच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे अल्सर लवकर बरे करण्यास मदत करते.

कसे वापरायचे?

- ४-५ ताजी तुळशीची पाने घ्या आणि ती हळूहळू चावत चघळत राहा. तुळशीच्या पानांचा रस तोंड आलेल्या ठिकाणी जिभेने लावा. यावर नंतर थोडे पाणी प्या. हा उपाय दिवसातून २ वेळा करा.

तोंड येणे टाळण्यासाठी या सवयी पाळा

१. पुरेसे पाणी प्या - डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

२. मसालेदार आणि गरम पदार्थ टाळा - अत्यधिक मसालेदार किंवा गरम अन्न खाल्ल्याने अल्सर वाढण्याची शक्यता असते.

३. पौष्टिक अन्न खा - आहारात हिरव्या पालेभाज्या, दही, केळी आणि व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध पदार्थांचा समावेश करा, हे पचनासाठी फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Crime: तिला मारून टाक, तुझं दुसरं लग्न करू; सोशल मीडियावर VIDEO पोस्ट करत पोलिसाच्या बायकोची आत्महत्या

Farmer Success Story : लातूरच्या मातीत विदेशी फळ; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, वर्षाकाठी घेताय एकरी १२ लाखाचे उत्पादन

Family Relations: घरी आलेल्या नातेवाईकांसमोर 'या' 4 चुका टाळा, घरचे वातावरण राहील आनंदी

SCROLL FOR NEXT