Dhanshri Shintre
उन्हाळ्यात पचन सुधारण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थ सेवन करणे फायदेशीर आहे, जे चांगले बॅक्टेरिया वाढवून पचन क्रिया सुधारतात.
भातातील यीस्ट वाढवून तयार केलेले इडली, डोसा पोटासाठी हलके आणि पचनासाठी आरामदायक आणि फायदेशीर असतात.
पनीर प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, घरी बनवलेल्या पनीरमध्ये फायदेशीर बॅक्टेरिया असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात.
दह्यातील चांगले बॅक्टेरिया अन्नाचे पचन सुधारतात, ज्यामुळे ते पचायला सोपे होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
लोणचे अन्नाची चव वाढवते आणि चांगल्या बॅक्टेरियांचा वाढवून आतड्यांचे आरोग्य सुधारते.
फायबरयुक्त हिरवे वाटाणे आहारात समाविष्ट केल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचन समस्यांपासून आराम मिळतो.
व्हिनेगरमध्ये भिजवलेल्या गाजर, मुळा, बीट आणि लसूण यांसारख्या प्रोबायोटिक्सचे नियमित सेवन पोटाच्या समस्यांवर नियंत्रण ठेवते.