Mega Block: प्रवाशांचा होणार खोळंबा! रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, कसं असेल वेळापत्रक? वाचा सविस्तर

Railway Mega Block: २३ मार्च २०२५ रोजी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी तिन्ही प्रमुख मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित होईल.
Mega Block
Mega BlockYandex
Published On

रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी उद्या म्हणजेच २३ मार्च २०२५ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम मुख्य म्हणजे मेन लाईन आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवेवर होणार असून काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल, तर काही सेवा रद्द केल्या जातील. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहे:

माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या वेळेत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा स्थानकावर धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या नियमित थांब्यांवर थांबतील आणि अंदाजे 1१५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

Mega Block
Tourism Fraud: लोणावळा-कर्जत व्हिला बुकिंग घोटाळा; ऑनलाइन फसवणुकीचा पर्दाफाश, आरोपी पुण्यात गजाआड

ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावरुन पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच ठाणे, येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या नियमित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावरुन पुन्हा अप जलद मार्गावर येतील. त्यामुळे या सेवा अंदाजे १५ मिनिटे उशीराने धावतील.

Mega Block
'औरंगजेबाने तलवारीने कापले नाहीत त्यापेक्षा जास्त सरकारने धोरणाने कापले', बच्चू कडू यांची सरकारवर टीका

कुर्ला ते वाशी दरम्यान २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान सुटणाऱ्या वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन सेवांसह सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ दरम्यान सुटणाऱ्या अप सेवाही रद्द करण्यात येतील. प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Mega Block
भारत पाकिस्तानपेक्षाही दुःखी, Happiness Report मध्ये जगातील सर्वात आनंदी देश कोणता?

मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. तसेच, हार्बर लाईन प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल. पायाभूत सुविधा देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे मेगा ब्लॉक्स आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

Mega Block
Pune: 70च्या दशकात तुफान भांडणं, तब्बल ४८ सालानंतर आता निकाल, आरोपीचं वय...; पुण्यातील धक्कादायक निकाल

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल जलद मार्गावर २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच काही लोकल सेवा रद्द केल्या जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com