
पिंपरी गावात १९७७ मध्ये दोन व्यक्तींमध्ये भांडण झाले होते, त्यात एकाला मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात किरकोळ मारहाण आणि जखमी केल्याचा गुन्हा दाखल केला होता, पण त्यानंतर हा गुन्हा चालूच राहिला. ४८ वर्षांनी, म्हणजेच आता २०२५ मध्ये या खटल्याचा निकाल अखेर लागला आहे. त्यावेळी आरोपी असलेले दोघे व्यक्ती आता ७० वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वयाचा विचार करत न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली. पुण्यातील हा ४८ वर्षांनी निकाल लागलेला पहिला खटला मानला जातो.
दिलीप नंदलाल शर्मा आणि किशोर नंदलाल शर्मा या दोघांवर १९७७ मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. गु. रं. नं. ४२२/१९७७ नुसार, त्यांच्यावर ३२४, ५०४, ३४ या कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते. तपासानंतर, १२ वर्षांनी, १९८९ मध्ये खटला दाखल करण्यात आला.
सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, आरोपी न्यायालयात हजर नव्हते त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. अखेर, ४८ वर्षांनंतर, न्यायालयाने दिलीप आणि किशोर शर्मा यांना ३ दिवस साधी कैद आणि ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले की, या खटल्याची सुनावणी पूर्वीच पूर्ण झाली होती.
मात्र, आरोपी खटल्याच्या तारखांना उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. पिंपरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती महाडिक यांनी दोन्ही आरोपींना ३ दिवस साधी कैद आणि ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ४८ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागल्याने पुण्यातील हा पहिला खटला ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.