Guruwar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Guruwar Upay: गुरुवारच्या दिवशी गुपचूप करा 'हे' उपाय; भगवान विष्णू प्रसन्न होऊन देतील आशिर्वाद

Thursday Vishnu remedy: गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि बृहस्पती देव यांना समर्पित आहे. या दिवशी विष्णू देवाची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात, आर्थिक भरभराट होते आणि घरात सुख-शांती नांदते अशी श्रद्धा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • गुरुवारी केलेले खास उपाय तुमच्यावर श्रीविष्णूची कृपा कायम राहण्यास मदत करतात.

  • या उपायांमुळे घरात धनसंपत्ती, सुख-शांती आणि समाधान येते.

  • काही उपाय केल्याने कुंडलीतील गुरू बलवान होतो आणि अडथळे दूर होतात.

हिंदू धर्मात गुरुवारचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या दिवशी विष्णूंची भक्ती, उपासना आणि काही खास उपाय केल्यास आयुष्यातील दुःख, अडथळे तसंच आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कुंडलीतील गुरु ग्रह देखील बलवान होतो. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण, विवाह यासारख्या अनेक बाबींमध्ये सकारात्मक बदल होतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरुवारच्या दिवशी काह उपाय करणं तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहणार आहे. हे उपाय कोणते आहेत ते पाहूयात.

एक रुपयाच्या नाण्याचा उपाय

गुरुवारी सूर्यास्तानंतर संध्याकाळच्या वेळी केलेल्या एका छोट्याशा उपायाने लक्ष्मीमातेची कृपा मिळू शकते. केलेच्या झाडाच्या मुळाशी चुपचाप एक रुपयाचे नाणे दाबून ठेवा. हा उपाय अतिशय सोपा असून, यामुळे घरात शांतता नांदते याशिवाय भांडणं टळतात.

पैशांशी संबंधित अडचणी दूर करण्याचा उपाय

गुरुवारी संध्याकाळी पिवळ्या कापडात एक रुपयाचं नाणं, गुळाचा छोटा तुकडा आणि सात हळदीच्या गाठी ठेवून त्याची पोटली बांधा. ही पोटली जवळच्या रेल्वे लाईनच्या बाजूला जाऊन टाका. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि आर्थिक अडचणी दूर होतात.

इच्छा पूर्ण होण्यासाठी गहू आणि गूळ दान करा

गुरुवारी मंदिरात जाऊन गहू आणि गूळ दान केल्याने कुंडलीतील गुरु ग्रह बळकट होतो. परिणामी अडकलेले काम मार्गी लागतात आणि मनातील इच्छा पूर्ण होतात. हा उपाय फक्त आर्थिक बाबींसाठी नाही तर वैयक्तिक जीवनातील यशासाठीही प्रभावी ठरतो.

बृहस्पतीदेवासाठी गूळ अर्पण करणे

गुरुवारच्या संध्याकाळी बृहस्पतीदेवाला गूळ अर्पण करा. हा उपाय नियमित केल्यास गुरु देव प्रसन्न होतात. यामुळे आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे यशाच्या संधी वाढतात. विशेषतः शिक्षण, नोकरी, विवाह यासारख्या बाबींमध्ये लाभ होतो.

आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपाय

जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी सतत येत असतील तर गुरुवारी सकाळी स्नानानंतर केळीच्या झाडाच्या मुळाशी पाणी आणि चणे अर्पण करा. हा उपाय नियमित केल्याने मोठमोठ्या अडचणी दूर होतात आणि घरात धनवृद्धी होते.

गुरुवारी कोणत्या देवाची पूजा केली जाते?

गुरुवारचा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे.

केळीच्या झाडाशी कोणता उपाय केल्यास आर्थिक संकट दूर होतात?

सकाळी स्नानानंतर केळीच्या झाडाच्या मुळाशी पाणी आणि चणे अर्पण केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात.

कोणत्या उपायामुळे घरातील भांडणं थांबतात?

केळील्या झाडाच्या मुळाशी एक रुपयाचं नाणं चुपचाप दाबल्यास घरात शांतता निर्माण होते.

गुरु ग्रह बळकट करण्यासाठी कोणतं दान करावं?

गहू आणि गूळ मंदिरात दान केल्याने गुरु ग्रह बलवान होतो.

रेल्वे लाईनजवळ पोटली टाकण्याचा उपाय कशासाठी उपयुक्त आहे?

हा उपाय आर्थिक अडचणी दूर करून मनोकामना पूर्ण करण्यासाठी फायदेशीर आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT