Budhwar Upay: श्रावणातील पहिल्या बुधवारी शंकर-गणपतीसाठी करा 'हे' उपाय; सर्व समस्या होतील दूर

First Wednesday of Shravan remedy : पवित्र श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे, तर बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित असतो. श्रावण महिन्यात शिव आणि गणपती दोघांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
Budhwar che Upay
Budhwar che Upaysaam tv
Published On

आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातोय. याचं कारण म्हणजे आज श्रावण महिन्यातील पहिला बुधवार आहे. श्रावण म्हणजे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र महिना आणि बुधवार हा गणपतीचा दिवस असतो. या दोन्ही संयोगामुळे आजचा दिवस विशेष भक्तांसाठी फार शुभ मानला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी भगवान शंकर आणि त्यांच्या सुपुत्र गणपतीची एकत्र पूजा केल्यास पित्याचा आणि पुत्राचा आशीर्वाद मिळतो.

हिंदू धर्मानुसार बुधवार हा गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित असतो आणि श्रावण महिना शिवपूजेसाठी अत्यंत शुभ असतो. त्यामुळे या दिवशी विशिष्ट पूजा आणि उपाय केल्यास जीवनातील विघ्न दूर होतात आणि सुख, शांती, समृद्धीचा वास होतो.

श्रावणातील पहिल्या बुधवारी शिव-गणेश पूजेचं महत्त्व

श्रावण महिन्याचा प्रत्येक दिवसाला काहीतरी वेगळं आध्यात्मिक महत्त्व असतं. यातील पहिला बुधवार म्हणजेच गणेश पूजेचा खास दिवस आणि जेव्हा तो शिव पूजेच्या श्रावण महिन्यात येतो तेव्हा दोघांची एकत्र आराधना करणं फारच शुभ मानलं जातं. हे व्रत केल्याने शंकराचा आणि पुत्राचा गणपतीचा एकत्र कृपाशिर्वाद लाभतो.

श्रावण बुधवार पूजन विधी

सकाळी लवकर उठून स्नान करा

श्रावणाच्या या विशेष बुधवारी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ, पवित्र वस्त्र धारण करा. मनात श्रद्धा ठेवून पूजेचा संकल्प घ्या.

शिव आणि गणपतीच्या मूर्ती स्वच्छ करा

गणपती आणि शिवशंकर यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करा. शक्य असल्यास तांब्याच्या पाण्यात गंगाजल मिसळा.

गणपतीची प्रथम पूजा

सर्वप्रथम गणपतीची पूजा करा. त्यांना दूर्वा, मोदक, फळं आणि पुष्प अर्पण करा. गणपतीला प्रथम पूज्य मानलं जातं. त्यामुळे ही पूजा पहिल्यांदा करणं आवश्यक असतं.

शिवलिंगाचा अभिषेक

घरी पारद शिवलिंग किंवा अन्य शिवलिंग असल्यास त्याचा अभिषेक करा. जल, दूध, दही, तूप, मध आणि साखर याने रुद्राभिषेक करा. यानंतर चंदन, अक्षता, फुलं, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा.

Budhwar che Upay
Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

मंत्रजप करा

गणपतीसाठी “ॐ गं गणपतये नमः” आणि भगवान शंकरसाठी “ॐ नमः शिवाय” या मंत्रांचा जप करा. प्रत्येक मंत्र कमीतकमी ११ वेळा म्हणा. हे मंत्र पिता-पुत्राच्या कृपेसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात.

आरती करा

सर्व पूजा झाल्यानंतर प्रथम गणपतीची आरती करा आणि त्यानंतर शंकराची आरती करा. दोघांची आरती केल्याने पूजन पूर्ण मानलं जातं.

श्रावण बुधवारचे शुभ उपाय

श्रावण महिन्यातील बुधवार फक्त पूजा-विधीच नव्हे तर काही खास उपायांसाठी देखील शुभ मानला जातो. हे उपाय श्रद्धेने आणि नियमाने केल्यास जीवनातील संकटं दूर होतात आणि नकारात्मकतेवर मात करता येते.

Budhwar che Upay
Dhanalakshmi Rajyog: 30 वर्षांनंतर शनीदेव होणार मार्गी; नव्या नोकरीसोबत या राशींना मिळणार धनलाभ

दान करा

या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पैशाचे दान अवश्य करा. बुध ग्रह दानाने प्रसन्न होतो आणि शुभ फळ देतो.

उपाय नियमित करा

श्रावणातील प्रत्येक बुधवारला शक्य असेल तितके हे उपाय आणि पूजन पद्धती आचरणात आणा. सातत्य ठेवल्यास या महिन्याचा संपूर्ण लाभ मिळू शकतो.

Budhwar che Upay
Lakshmi Narayan Yog: 12 वर्षांनंतर शुक्र बनवणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार धनलाभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com