Dhanalakshmi Rajyog: 30 वर्षांनंतर शनीदेव होणार मार्गी; नव्या नोकरीसोबत या राशींना मिळणार धनलाभ

Shani Dev Margi In Meen 2025 : शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी साधारणपणे अडीच वर्षांचा कालावधी घेतात आणि संपूर्ण १२ राशींचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे ३० वर्षे लागतात.
Dhanalakshmi Rajyog
Dhanalakshmi Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे दीर्घायुष्य, दु:ख, रोग, कर्म, तंत्रज्ञान, खनिज तेल, लोखंड, नोकरदार वर्ग, तुरुंग, सेवक, नियमन अशा गोष्टींचे कारक आहेत. ते कर्माचे फळ देणारे ग्रह मानले जातात आणि जेव्हा ते मार्गी होतात. तेव्हा अनेक राशींवर शुभ फलदायक प्रभाव टाकतात.

२०२५ च्या अखेरीस शनिदेव मार्गी होणार आहेत. त्यामुळे काही निवडक राशींना धन राजयोग लाभू शकतो. याचा थेट परिणाम त्या राशीच्या लोकांच्या नशिबावर, उत्पन्नावर आणि करिअरमध्ये प्रगतीवर होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

Dhanalakshmi Rajyog
Jupiter Saturn Yuti effects: 12 वर्षांनी गुरु-शनि बनवणार दुर्लभ संयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार, पैसाही येणार हाती

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. तुमच्या व्यवसाय, नोकरी किंवा कलेच्या क्षेत्रात भरभराट होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्हाला नवीन उत्पन्न स्रोत मिळतील, आर्थिक स्थिरता वाढेल आणि कला, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खास फायदेशीर ठरणार आहे.

तूळ रास (Libra)

तुला राशीसाठी देखील हा कालखंड खूप सकारात्मक आहे. शनिदेव या राशीच्या सहाव्या भावात मार्गी होत आहेत. तुमच्यावर असलेले कोर्टचे खटले किंवा जुने वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या काळात गुप्त शत्रूंवर विजय मिळवता येणार आहे. या काळात वाहन खरेदी, घर घेणे किंवा संततीसंबंधी आनंदाची बातमी मिळू शकते.

Dhanalakshmi Rajyog
Guru Surya Uday: 12 वर्षांनंतर गुरु सूर्यासोबत बनवणार खास संयोग; 3 राशींना बिझनेसमधून मिळणार केवळ पैसा

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ जीवनात सुख-समृद्धी घेऊन येणारा ठरणार आहे. शनिदेव या राशीच्या चतुर्थ भावात मार्गी होणार आहे. हा भाव घर, संपत्ती, मानसिक स्थैर्य आणि माता यांच्याशी संबंधित असतो. गुंतवणूक केलेले पैसे चांगल्या परताव्यात मिळू शकतात. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.

Dhanalakshmi Rajyog
Weekly Horoscope: कौटुंबिक समस्यांवर तोडगा निघेल, आर्थिक उलाढाली होतील; पाहा साप्ताहिक राशीभविष्य

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com