Mangalwar upay saam tv
लाईफस्टाईल

Mangalwar upay: मंगळवारच्या दिवशी करा हे उपाय; मंगळ दोष दूर होऊन कर्जापासूनही मिळेल मुक्तता

Tuesday remedy for Mangal Dosha: ज्योतिषशास्त्रात मंगळ दोष आणि कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय पूर्ण श्रद्धेने केल्यास हनुमानजींच्या कृपेने तुमचे सर्व कष्ट दूर होतात आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते.

Surabhi Jayashree Jagdish

  • मंगळवार हा हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे.

  • हनुमान पूजा आणि चालीसा मंगळदोष कमी करते.

  • मंगळ मंत्राचा जप ग्रहाच्या दुष्प्रभावावर उपयुक्त आहे.

हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आणि व्रत अनेक अडचणींमधून तुम्हाला मुक्तता देतात. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ज्यांच्या कुंडलीत मंगळदोष आहे किंवा जे आर्थिक अडचणींनी त्रस्त आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव वैवाहिक जीवन, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे मंगळवारी खास उपाय केल्यास या त्रासांपासून आराम मिळू शकतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार कोणते उपाय केले जाऊ शकतात आणि त्याचा कसा प्रभाव पडतो ते पाहूयात.

मंगळदोष कमी करण्यासाठी उपाय

हनुमानाची पुजा करा

मंगळवारी सकाळी स्नान करून हनुमानजींची विधीवत पूजा करा. त्यांना लाल फुलं अर्पण करा. लाल रंग मंगळ ग्रहाशी संबंधित मानला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक मंगळवारी श्रद्धेने हनुमान चालीसा वाचा. हे मन, शरीर आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं.

मंगळ मंत्राचा जप करा

याशिवाय हनुमानजींना बूंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवा. हा नैवेद्य अतिशय शुभ मानला जातो. "ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः" या मंगळ मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे मंगळाचा दुष्प्रभाव कमी होतो. मंगळवारी गरजू व्यक्तींना लाल वस्त्र, मसूर डाळ किंवा गूळ दान करा. याने ग्रह शांत होतात.

कर्जमुक्ती मिळवण्यासाठी उपाय

हनुमान मंदिरात सिंदूर अर्पण करा

मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन त्यांच्या मूर्तीवर सिंदूर चढवा. याने आर्थिक संकट कमी होतात. याशिवाय मंगळ ग्रहाशी संबंधित हे स्तोत्र नियमित पठण केल्याने कर्जमुक्तीच्या वाटा खुल्या होतात. त्याचप्रमाणे पिंपळाच्या 11 पानांवर चंदनाने ‘श्रीराम’ लिहा आणि ते हनुमानजींना अर्पण करा.

नारळाचा उपाय करा

एक नारळ डोक्यावरून सात वेळा फिरवा आणि हनुमान मंदिरात ठेवून या. हे उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतात. याशिवाय शुद्ध मनाने 100 वेळा हनुमान चालीसा वाचल्यास मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते.

मंगळवारी आवर्जून करावेत असे काही उपाय

  • गायीला पोळी खाऊ घालणं पुण्याचं मानलं जातं. याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.

  • घराच्या दक्षिण दिशेची स्वच्छता मंगळाच्या प्रभावासाठी उपयुक्त असतं.

  • मंगळवारी कर्ज घेणं अपशकुन मानलं जातं. या दिवशी कर्ज घेणं टाळावं.

  • गूळ, चणे, केळं किंवा शेंगदाणे एखाद्या प्राण्याला खाऊ घालणं मंगळदोष दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

  • मंगळवारी मांसाहार टाळा आणि फक्त सात्विक जेवण घ्या. याने शरीर आणि मन शांत राहतं.

  • लाल रंग मंगळ ग्रहाशी निगडित आहे. या दिवशी लाल वस्त्र परिधान केल्याने शुभ फळं मिळतात.

मंगळवारचा दिवस कोणाला समर्पित आहे आणि का?

मंगळवार हा भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे. मंगळ ग्रहाच्या प्रतिकूल प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी या दिवशी विशेष उपाय केले जातात.

मंगळदोष कमी करण्यासाठी कोणते धार्मिक उपाय सांगितले आहेत?

हनुमानजींची पूजा, लाल फुले अर्पण करणे, हनुमान चालीसा वाचणे आणि "ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः" या मंत्राचा जप करणे याने मंगळदोष कमी होतो.

कर्जमुक्तीसाठी मंगळवारी कोणते उपाय करावेत?

हनुमान मंदिरात सिंदूर चढवणे, नारळ डोक्यावरून फिरवून मंदिरात ठेवणे आणि पिंपळाच्या 11 पानांवर ‘श्रीराम’ लिहून अर्पण करणे यामुळे कर्जमुक्तीच्या वाटा खुलतात.

मंगळवारी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

मंगळवारी कर्ज घेणे आणि मांसाहार करणे टाळावे. या दिवशी या कृती अपशकुन मानल्या जातात.

मंगळवारी कोणता रंग शुभ मानला जातो आणि का?

लाल रंग मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळवारी लाल वस्त्र परिधान केल्याने ग्रहाचा दुष्प्रभाव कमी होतो आणि शुभ फळे मिळतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्त्यावरील वाहतूक बंद, पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी; काय आहे कारण?

पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत भेंडीची भजी; हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Badlapur: बदलापूर हादरले! उल्हास नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT