Diabetes Tips, Diabetes patients Eat These 5 Foods
Diabetes Tips, Diabetes patients Eat These 5 Foods  Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी हे ५ पदार्थ खायलाच हवे, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

कोमल दामुद्रे

How To Control Blood Sugar :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सततची चिंता यामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडतो. यामुळे आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

मधुमेह (Diabetes) नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असायला हवी. तसेच साखरेसोबत (Sugar) आपल्याला आहाराची देखील विशेष काळजी घ्यायला हवी. जर तुम्हालाही मधुमेहासारखा गंभीर आजार (Disease) जडला असेल तर आहारात या ५ पदार्थांचे अवश्य सेवन करा.

1. गाजर

गाजरमध्ये बीटा कॅरोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वे ए आणि के भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये चांगेल अँटी-ऑक्सिडंट देखील आहे. यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. ज्यामुळे याचे सेवन केल्यान रक्तातील साखर वाढत नाही.

2. हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी सारख्या हिरव्या पालेभाज्यांच्या आहारात समावेश करा. यामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यात मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. मॅग्नेशियममुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम आणि आयरन अधिक प्रमाणात आढळते. यात असणारे घटक ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

3. कारले

कारले हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यामध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. चांगले अँटी-बॅक्टेरियल एजंट आहे. याच्या सेवनाने भूक कमी लागते, रक्तातील साखरेची पातळी कमी करते. तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

4. दुधीभोपळा

दुधीभोपळ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. यात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. तसेच यकृताचे कार्य सुधारते. यामुळे शरीर हायड्रेट राहाण्यास मदत होते.

5. कच्ची केळी

कच्च्या केळीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, स्टार्च, व्हिटॅमीन बी ६ अधिक प्रमाणात असते. जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. वजन नियंत्रित करते, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही..; केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

Today's Marathi News Live : वैजापूर तालुक्यातील 102 गावं मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत

Baramati Fire: बारामती एमआयडीसीमध्ये भीषण आग, परिसरात धुरांचे लोळ

Mahananda Dairy News : महानंदचा कारभार आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे | Marathi News

Pune News : विद्यार्थिनीच हॉस्टेलमधील मुलींचे व्हिडिओ काढून पाठवत होती बॉयफ्रेंडला; पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT