कोमल दामुद्रे
आरोग्यासाठी ड्रायफ्रूट्स अतिशय फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते.
जर तुम्ही देखील ड्रायफ्रूट्स खात असाल तर अंजीरचे सेवन करु शकता. ज्यामुळे आरोग्याला फायदा होईल.
अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमीन बी, फायबर आणि लोह यांसारख्या पोषक आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
अंजीरमध्ये उष्ण घटक जास्त असल्याने उन्हाळ्यात न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यामुळे नुकसान होते का? जाणून घेऊया
अंजीरच्या अतिसेवनामुळे डोळ्यांच्या बुबळाच्या पुढील भागाचा होणारा दाह आणि नासिकांना त्रास होऊ शकतो. अस्थमाच्या रुग्णांनी हे खाऊ नये.
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने सूज येऊ शकते, ज्यामुळे पोटात जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
अंजीर दूधात उकळवून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा