कोमल दामुद्रे
शरीर निरोगी आणि आरोग्यदायी राहाण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.
तंदुरुस्त राहाण्यासाठी आपण आहारात पोषक घटकांचा समावेश केला पाहिजे. त्यासोबतच व्यायाम देखील केला पाहिजे.
शरीरासाठी खजूर देखील फायदेशार ठरतात. त्यामध्ये शरीरासाठी आवश्क पोषक तत्व आढळतात.
एक महिना खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला फायदा होईल. यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स आहेत जे तुमच्या त्वचेला निरोगी ठेवतात.
दररोज ४ ते ६ खजूर खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो. त्यासोबतच अनेक आजारांना टाळण्यास मदत होते.
माहितीनुसार, खजूरमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळतात ज्यामुळे बद्धकोष्ठ आणि पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
खजूर खाल्ल्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारते त्याचं कारण म्हणजे त्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांमुळे मेंदूच्या पेशांची निरोगी वाढ होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.