कोमल दामुद्रे
दातांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आपण महागातला टूथब्रश वापरतो.
टूथब्रश निवडताना फक्त मऊ ब्रिस्टल निवडावा. खूप कठीण ब्रिस्टल असलेला टूथब्रश खरेदी करु नका.
टूथब्रशमुळे आपल्याला अनेक प्रकारचे बॅक्टेरिया संक्रमण टाळता येते. त्यामुळे दात घासण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
जर तुम्हाला दात आणि हिरड्यांची समस्या टाळायची असेल तर दर २ ते ३ महिन्यांनी टूथब्रश बदलावा.
टूथब्रश वेळोवेळी बदलला नाही तर दात आणि हिरड्यांशी संबंधित अनेक समस्या वाढू शकतात.
ब्रश नियमित अंतराने बदलला नाही तर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
दाताची आणि तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी इतर कोणाचा टूथब्रश वापरु नका. त्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या
तोंडाच्या समस्या टाळण्यासाठी सकाळी आणि रात्री नियमितपणे टूथब्रश करा.