Daycare Safety Tips for Parents google
लाईफस्टाईल

Daycare Safety : पालकांसाठी अलर्ट! डे केअरमध्ये मुलांना ठेवण्यापूर्वी तपासा ‘या’ महत्वाच्या सुविधा

Childcare Tips : पालकांनी डे केअर निवडताना परवाने, सीसीटीव्ही, स्वच्छता, प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षितता तपासावी. योग्य सुविधा असलेले डे केअर मुलांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी आणि आनंददायी ठरते.

Sakshi Sunil Jadhav

लहान मुलांना अनेक पालक त्यांच्या सोयीनुसार 'डे केअर'मध्ये ठेवतात. ज्या महिला कामानिमित्त बाहेर असतात. त्यांच्यासाठी ही सुविधा खूप फायदेशीर ठरते. मात्र अलिकडेच डे केअरशी संबंधित अशा घटना समोर आल्यात की ते पाहून सगळे पालक थक्क झालेत. पुढे याबद्दल सविस्तर माहिती आणि घडलेली घटना दिली आहे. तसेच मुलांना 'डे केअर'मध्ये ठेवताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे याबद्दल सोप्या शब्दात सांगितले आहे.

नुकतीच उत्तर प्रदेशात एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना घडली. नोएडामध्ये सेक्टर १३७ मधील पारस टिएरा सोसायटीमधील एका 'डे केअर' सेंटरमध्ये १५ महिन्यांच्या निष्पाप चिमुकलीसोबत अमानुष वागणूक करण्यात आली. यामध्ये डे केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या मोलकरणीवर मुलीला चापट मारुन जमिनीवर फेकवे. पुढे मुलीला प्लास्टिकच्या पट्टयाने मारहाण करुन चावा घेतल्याचेही समोर आले आहे. या प्रकारानंतर चिमुकलीला गंभीर दुखापत झाली आहे. यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.

काम करणाऱ्या पालकांसाठी डे केअर म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेची आणि काळजीची सोय करणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. दिवसा पालक आपल्या कामात व्यस्त असताना मुलांना डे केअरमध्ये ठेवतात, जिथे त्यांची देखरेख केली जाते आणि वयोगटानुसार खेळ, शिकवणी किंवा इतर उपक्रम आयोजित केले जातात. मुलांसाठी डे केअर निवडताना पालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम, त्या डे केअरकडे आवश्यक परवाने आहेत का हे तपासणे आवश्यक आहे, कारण डे केअर उघडण्यापूर्वी कायदेशीर परवाने घेणे बंधनकारक असते. तसेच, मुलांच्या सुरक्षिततेसाठी डे केअरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत का आणि पालकांना थेट त्याचे निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. अनेक डे केअर केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी पालकांना त्याचा थेट प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे अशा ठिकाणी मुलांना ठेवणे टाळावे.

स्वच्छता ही मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने डे केअरमध्ये स्वच्छ वातावरण, स्वच्छ बाथरूम आणि योग्य आरोग्यविषयक सुविधा आहेत का हेही पाहावे. मुलांच्या देखरेखीसाठी असलेले कर्मचारी प्रशिक्षित आणि अनुभवी आहेत का हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. त्यांना मुलांना हाताळण्याचा आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा पुरेसा अनुभव असावा. योग्य सुविधा आणि सुरक्षित डे केअरची निवड केल्यास पालक निश्चिंतपणे आपल्या मुलांना तिथे ठेवू शकतात आणि ते दिवसभर सुरक्षित, निरोगी आणि आनंदी राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT