चेहऱ्यावर डार्क स्पॉटचा यकृताशी संबंध
नेहमीपेक्षा जास्त काळे डाग असू शकतात लिव्हर समस्येचं लक्षण
डार्क स्पॉट किंवा त्वचेवरील रंगांमधील बदल थेट यकृताशी संबंधित
अनेकांच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स असतात. चेहरा, हात, खांदे किंवा पायांवर लहान काळे रंगाचे डाग असतात. दरम्यान, यातील काही डार्क स्पॉट्स हे सौम्य असतात ज्याचा तुमच्या शरीरावर फार परिणाम होत नाही. दरम्यान, काही डार्क स्पॉट किंवा त्वचेवरील रंगांमधील बदल हा थेट तुमच्या यकृताच्या समस्यांसाठी कारणीभूत असतात, असं एका संशोधनातून समोर आले आहे.
यकृत हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. यकृताच्या तुमच्या शरीरावर खूप परिणाम होतो. दरम्यान, काळे डाग आणि यकृताच्या समस्या यांचा जवळचा सबंध आहे. त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट असतील तर या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात.
काळे डाग आहेत तरी काय? (How Dark Spot Link with Liver)
बहुत डार्क स्पॉट म्हणजे काळे डाग हे सुर्यप्रकाशाशी संबंधित असतात. यामुळे हायपरपिंग्मेंटेशन यकृताच्या समस्या होऊ शकतात. त्वचेच्या आजूबाजूचा भाग हा चेहऱ्याच्या रंगापेक्षा जास्त डार्क होणे हे हार्मोलन असंतुलनमुळे होते. अभ्यासामध्ये असे दिसून आले की, सिरोसिस आणि हेपेटायटीस या यकृताच्या आजारांचा थेट संबंध चेहऱ्यातील रंगात होणाऱ्या बदलांशी जोडण्यात आला आहे. अभ्यासात दिसून आले आहे की, यकृताची समस्या असलेल्या अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावरील रंगात बदल झाला आहे.
दोन प्रकारचे काळे डाग (Two Different Dark Spots)
यकृताची समस्या असल्याने चेहऱ्यावर येणारे काळे डाग आणि वयोमानानुसार येणारे काळे डाग यामध्ये फरक असतो. वयोमानानुसार तयार होणारे काळे डाग हे हळूहळू विकसित होतात. ते गुळगुळीत, सपाट आणि एकसारखी तपकिरी असतात. तर यकृताशी संबंधित काळे डाग हे अचानक दिसायला सुरुवात होते. ते थोडे जास्त गडद आणि चिखलाच्या रंगासारखे असतात. हे डाग चेहरा, मान, तळवे, जीभ यावर असतात.
हार्मोलन असंतुलन (Harmonal Imbalance)
जेव्हा तुमच्या हार्मोलनमध्ये बदल होतो तेव्हा मेलेनिन तयार करण्यासाठी जबाबदार असलेल्या पेशींना जास्त उत्तेजित करते. मेलेनिनमुळे तुमच्या त्वचेचा रंग बदलतो. हार्मोलनमध्ये बदल झाल्यामुळे मेलेनोसाइट्स उत्तेजित होतात. यामुळे शरीरावर काळे ठिपके तयार होतात.
यकृतात बिघाड
जर तुमच्या यकृतात बिघाड झाला तर साचलेले विषारी पदार्थ ऑक्सिडेटिव्ह तुमच्या शरीरावर ताण निर्माण करु शकतात. यामुळे तुमच्या पेशींना नुकसान होते आणि मेलेनोसाइट्स वाढतात. यामुळे हायपरपिंग्मेंटेशनमुळे तुमच्या शरीरावर काळे डाग दिसू शकतात.
यकृताच्या समस्यांचे निदान
जर तुमच्याही शरीरावर असे डाग असतील जे अचानक यायला सुरुवात झाली असेल तर त्याची योग्स चाचणी व्हायला हवी. यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडून सल्ला घ्यायला हवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.