Sakshi Sunil Jadhav
बाजारातून कांदे आणताना बऱ्याचदा त्यावर असलेले काळे डाग दुर्लक्षित होतात. मात्र आता तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. संशोधनात मोठं तत्थ उघड झालं आहे.
कांदे कितीही फायदेशीर असला तरी, त्यावरचे काळे डाग तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे काही टिप्स तुम्ही नोंदवून ठेवल्या पाहिजेत
कांद्यावर दिसणारे काळे पट्टे, डाग किंवा रेघा हे साधे डाग नसून अॅस्परगिलस नायजर नावाच्या बुरशीमुळे तयार झालेले फंगल स्पॉट्स असतात.
कांद्यावरच्या बुरशीच्या काही प्रकारांमधून ऑक्रॅटॉक्सिन-ए नावाचे विष तयार होऊ शकते. हे विष किडनी आणि लिव्हरला हानी पोहोचवू शकतं.
धुतल्यावर अनेकदा काळे डाग हलके दिसतात किंवा नाहीसे वाटतात, पण फंगल टॉक्सिन्स काढले जात नाहीत. त्यामुळे असे कांदे खाणे टाळा.
जर काळा डाग फक्त बाहेरच्या थरावर असेल, तर तो थर काढून टाकू शकता. पण खोलपर्यंत बुरशी दिसत असल्यास कांदा वापरू नये.
कांद्यात व्हिटॅमिन C, B6, फायबर, अँटीऑक्सिडंट्स असतात. तो इम्युनिटी, हृदयाचे आरोग्य, रक्ताभिसरण आणि पचन सुधारतो.
जास्त कांदा खाल्ल्यास अॅसिडिटी, गॅस, पोटदुखी, छातीत जळजळ आणि काही लोकांमध्ये डोकेदुखी होऊ शकते. कच्चा कांदा विशेषतः जड असतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.