Sakshi Sunil Jadhav
काही भागात नाश्यासाठी उपमा, पोहे, शिरा, मिसळ पाव, वडा पाव, बन मस्का अशा विविध पदार्थांचा समावेश करतात.
नाश्यामध्ये जर यातील पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अॅसिडीटीच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पुढे आपण पचायला हलका आणि अॅसिडी होणार नाही याची काळजी घेऊन चविष्ठ उपम्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
१ कप रवा, २ कप पाणी, अर्धा कप घोसाळं, अर्धा कप मटार, गाजर, किसलेला ओला नारळ, जिरं, तूप, मीठ, साखर चिमुटभर इ.
कढईत थोडं तूप किंवा कोकोनट ऑइल गरम करा. मध्यम आचेवर रवा हलक्या सोनेरी होईपर्यंत 3 ते 4 मिनिटे सतत हलवत भाजा. जास्त भाजू नका.
कढईत थोडे बारीक जिरे घाला, सोबत बडीशेप असल्यास पित्ताला आराम देते. तिखट हिरवी मिरची न वापरता, त्याऐवजी थोडं जीरं वापरा. हिंग टाळा किंवा फारच कमी घाला.
दुसऱ्या पॅनमध्ये अगोदर चहा पद्धतीने कमी तेलात घोसाळं व इतर निवडक भाज्या २ ते ३ मिनिटे शिजवा. भाज्या जास्त शिजवू नका, थोड्या क्रंची ठेवा.
एका भांड्यात २ कप पाणी उकळवा. मीठ सर्वसाधारण कमी ठेवा. जास्त मीठ पित्त वाढवतं. पाण्यात 1 चिमूट साखर शिजवायला टाकल्यास पित्त नियंत्रित होण्यास मदत होते.
उकळत्या पाण्यात हळू हळू रवा घालत जा आणि सतत हलवत राहा जेणेकरून गाठी होणार नाहीत. मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या. नंतर थोडं तूप टाका. त्यानंतर किसलेला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. नारळ आणि कोथिंबीर हे दोन्ही पित्ताला शांत करणारे असतात.
उपमा खूप गरम असल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोडे थंड होऊ द्या आणि नंतर सर्व्ह करा. सोबत तेलकट किंवा तिखट चटणी टाळा. ती पित्त वाढवू शकते. रोजच्या आहारात पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी तिखट, नेहमीचे तेल, अति प्रोसेस्ड पदार्थ कमी करा.