Sakshi Sunil Jadhav
कांदे पोहे हा आपल्या घरातला नेहमीचा नाष्टा असतो. पण काही लोकांना पोहे खाल्ल्यावर पित्त, जळजळ किंवा आम्लपित्त जाणवतं. अशा लोकांसाठी हे कांदे पोहे हलके, आरोग्यदायी आणि पित्त न होणारे कसे बनवायचे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
योग्य पद्धतीने केलेले पोहे फक्त चविष्टच नाही तर पचायलाही हलकी असते. चला तर जाणून घ्या पित्त न होणारे कांदे पोहे बनवण्याच्या खास टिप्स.
जाड पोह्यांपेक्षा मध्यम किंवा पातळ पोहे पचायलाही हलके असतात आणि पित्त होण्याची शक्यता कमी होते.
जास्त भिजवल्यास पोहे चिकट होतात व पित्त वाढू शकतात. कमी पाण्यात धुऊन लगेच बाजूला ठेवा.
जास्त तेल, तूप किंवा फोडणी पित्त वाढवतं. हलकी फोडणी वापरा. तसेच कांदे जास्त तळले की आम्लपित्त वाढतं. फक्त परतून होईपर्यंत शिजवा.
तिखट मिरच्या पित्त वाढवतात. त्याऐवजी हलक्या तिखट किंवा एकच मिरची वापरा.
हळद पचन सुधारते आणि साखर पोह्यांना संतुलित चव देते, पण प्रमाण मर्यादित ठेवा.
कच्चे बटाटे परतल्यास तेल जास्त लागते. यामुळे पित्त वाढते. शिजलेले किंवा वाफवलेले बटाटे उत्तम घ्या.
लिंबू जास्त आचेवर घातल्यास कडूपणा आणि आम्लपित्त वाढते. गॅस बंद केल्यावरच पिळा. सर्व्ह करताना गार नारळ किंवा कोथिंबीर घाला. त्याने शरीराला शांतता मिळते आणि पोह्यांची पचनक्षमता वाढते.