Liver Cancer Symptoms: लिव्हर कॅन्सर झालास शरीराच्या 'या' बाजूस होतात वेदना, तज्ज्ञांनी दिली महत्वाची टीप

Cancer Warning: उजव्या बाजूच्या पोटात वेदना, सतत थकवा आणि वजन घटणे ही लिव्हर कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळेवर तपासणी अत्यंत आवश्यक आहे.
Cancer Warning
Liver Cancer Symptomsgoogle
Published On

लिव्हर हा आपल्या शरीरात खूप महत्वाचा भाग मानला जातो. याचे एकदा नुकसान झाले की, आपल्या संपूर्ण जीवनशैलीत बदल होतो. लिव्हर खराब होण्यापुर्वी शरीर बऱ्याचदा संकेत देत असते. आपण आपल्या चुकीमुळी आळसामुळे दुर्लक्ष करतो आणि शेवटी आपल्याला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.

आपल्या शरीरात अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना जाणवतात. कधी पोटात जडपणा जाणवतो, कधी सतत थकवा येतो, तर कधी कंबर आणि पोटाच्या मधल्या भागात हलकी वेदना जाणवते. बऱ्याच वेळेस आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशी काही लक्षणे गंभीर आजारांकडेही इशारा करत असू शकतात.

Cancer Warning
Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

लिव्हरचा कॅन्सर हा त्यापैकीच एक गंभीर आजार आहे. याबाबत तज्ज्ञ सांगतात की, जर पोटाच्या उजव्या बाजूला सतत वेदना होत असतील, तर ते लिव्हरच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असते. लिव्हर हा शरीराच्या उजव्या बाजूला, पोटाच्या वरच्या भागात असतो. त्यामुळे कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात या भागात वेदना जाणवू लागतात. या वेदना खूप वेळ त्रास देत असतात, तर काही वेळा मधूनमधून वाढत जातात. काही रुग्णांमध्ये ही वेदना पाठीपर्यंत किंवा खांद्यापर्यंतही पसरू शकते.

लिव्हर कॅन्सरच्या आजारात फक्त वेदनाच नाही, तर इतरही अनेक लक्षणं दिसतात. रुग्णाला सतत थकवा जाणवतो, वजन कारण नसताना कमी होते, भूक लागत नाही, त्वचा आणि डोळे पिवळे पडतात म्हणजेच कावीळ दिसून येते. याशिवाय पोट फुगल्यासारखे वाटणे, पोटात जडपणा, वारंवार मळमळ किंवा उलट्या होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याची कारणे म्हणजे बऱ्याच दिवस मद्यपान करणं, हिपॅटायटिस बी किंवा सी विषाणूची लागण, फॅटी लिव्हरची समस्या, लठ्ठपणा, असंतुलित आहार, धूम्रपान आणि एकूणच अस्वस्थ जीवनशैली यामुळे या आजाराचा धोका वाढतो.

मात्र योग्य वेळी काळजी घेतल्यास लिव्हरच्या कॅन्सरपासून बचाव करणं शक्य आहे. मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर राहणे, संतुलित आणि पोषक आहार घेणे, नियमितपणे यकृताची तपासणी करून घेणे, हिपॅटायटिस बीची लस घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करणे हे उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Cancer Warning
Liver Tumor Symptoms: लिव्हरच्या सर्व गाठी कॅन्सरच्या असतात का? डॉक्टरांनी सांगितला फरक आणि लक्षणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com