Banana Peel Benefits  Saam TV
लाईफस्टाईल

Banana Peel Benefits: डोळ्यांखालील काळी वर्तुळे मिनिटांत होतील गायब, वाचा केळीच्या सालीचे भन्नाट फायदे

Kelichya Saliche Fayde: पावसात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. केळीप्रमाणे केळीची साल देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळीची साल त्वचा मुलायम करते. त्यामुळे केळीची साल फेकून न देता त्वचेसाठी तिचा वापर करा.

Shreya Maskar

पावसाळ्यात फिरण्यासोबत त्वचेची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग आणि मुरूमांची संख्या वाढते. ज्यामुळे कधीकधी त्वचेला ॲलर्जी होण्याचा धोका उद्भवतो. अशावेळी त्वचेची नियमित काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण केळ खातो. मात्र केळ्याची सालं टाकून देतो. पण केळ्याची साल टाकून न देता पावसाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी तिचा वापर होऊ शकतो. केळ्याची सालीमधील पोषक घटक त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

त्वचेचे आरोग्य

केळीच्या सालं त्वचेसाठी फायदेशीर ठरते. पावसाळ्यात चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी केळीची सालं चेहऱ्यावर चोळावी. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील लाल चट्टे देखील दूर होतात. त्वचा हायड्रेटेड राहून तजेलदार दिसते. आठवड्यातून २ ते ३ वेळा तुम्ही केळ्याची सालं चेहऱ्यावर चोळू शकता. यामुळे त्वचेची जळजळ देखील कमी होते. केळ्याच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे चेहऱ्याचे तारुण्य टिकून राहते. केळ्याच्या सालीमधील दाहक विरोधी गुणधर्म त्वचेचे ॲलर्जीपासून संरक्षण करतात.

डोळ्यांखालील काळे डाग

झोपेच्या अभावामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. ज्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते. अशावेळी केळीच्या साली १५ ते २० मिनिटांसाठी डोळ्यांखालच्या भागावर ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे डोळे देखील शांत होतील. डोळ्यांची जळजळ कमी होते. तसेच डोळ्यांवरील बारीक रेषा दूर होतात.

दातांचे आरोग्य

चमकदार दातांसाठी नियमित केळ्याचे सालं दातांवर चोळावे. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होऊन. दात शुभ्र - पांढरे होतात. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते जे तुमचे दातांचे आरोग्य चांगले ठेवते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT