Dahi Handi 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Dahi Handi 2024 : यंदा २६ की २७ ऑगस्ट नेमकी केव्हा फोडायची दहीहंडी; वाचा योग्य तारीख आणि तिथी

Dahi Handi 2024 Dates : यंदा दहीहंडी नेमकी कोणत्या तारखेला आहे? या बद्दल नागरिकांच्या मनात बराच संभ्रम आहे. त्यामुळे आज दहीहंडीची योग्य तारीख काय आहे ते जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

हिंदू धर्मात विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाला विशेष महत्व आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात श्रीकृष्णाला समर्पित जन्माष्टमी साजरी केली जाते. म्हणजेच नटखट कृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रासह गुजरातमध्ये हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदा दहीहंडी नेमकी कोणत्या तारखेला आहे? या बद्दल नागरिकांच्या मनात बराच संभ्रम आहे. त्यामुळे आज दहीहंडीची योग्य तारीख काय आहे ते जाणून घेऊ.

दहीहंडीची तिथी काय?

पंचांगात दिलेल्या माहितीनुसार, श्रावण कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी २६ ऑगस्ट २०२४ रोजी देण्यात आली आहे. पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी या तिथीस प्रारंभ होत आहे. तर २७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री २ वाजून १९ मिनिटांपर्यंत हा काळ सुरू असणार आहे. हिंदू धर्मातील धार्मिक मान्यतेनुसार यावेळेत श्रीकृष्णाचा जन्मोत्सोव साजरा केला जातो.

दहीहंडी केव्हा फोडतात?

हिंदू धर्मात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व दहीहंडी फोडल्या जातात. म्हणजे यावर्षी दहीहंडी २७ ऑगस्ट रोजी फुटणार आहे. महाराष्ट्रात तर हा सण एक सहासी खेळ म्हणून सुद्धा खेळला जातो.

यंदा विविध शहरांत दहीहंडी उत्सवाची तयारी आतापासूनत सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी महिला गोविंदा मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याची तयारी करत होत्या. त्यांचा हा सहासी व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

हिंदू धर्मात विविध पद्धतीचे सण आणि उत्सव साजरे केले जातात. त्यात श्रीकृष्णांच्या जन्मत्सोवाला सुद्धा फार महत्व आहे. यंदा श्रीकृष्णाची ही ५२५१ वी जयंती असल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT