Ruchika Jadhav
यंदा २७ ऑगस्ट रोजी गोपाळकाला आहे. त्यानिमित्त सर्व तरुणांनी आतापासूनच दहीहंडी फोडण्याची तयारी सुरू केली असेल.
दहीहंडी फोडण्याआधी आपण तिला सुंदर सजवतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही डेकोरेशनचे फोटो शोधले आहेत.
बाळ कृष्णाच्या आठवणीत तुम्ही हांडी सुंदर सजवून त्यावर एक मोरपंख लावू शकता.
यासाठी तुम्ही हंडीला लाल रंग देऊन कुंदनचे डायमंड यावर चिटकवू शकता.
मनवी मनोरे रचत दर वर्षी दहीहंडीचा सहासी खेळ खेळला जातो.
तुम्ही हंडी सजवताना त्यावर पिवळा आणि निळा रंगाचं भन्नाट कलर कॉम्बीनेशन वापरू शकता.
हंडीला सुंदर रंग देऊन त्यावर सफेद रंगाचे मोती लावल्यावर ते सुद्धा छान दिसतात.
तुम्ही पातीच्या हंडीला कोणताही रंग न देता त्यावर अशा पद्धतीने पांढरी डिझाईन काढू शकता.