Curry Leaves For Skin SAAM TV
लाईफस्टाईल

Curry Leaves For Skin : रोजच्या जेवणातील 'कढीपत्ता' देईल ग्लोइंग त्वचा, पिंपल्स होतील छूमंतर

Curry Leaves Skin Benefits : चमकदार, मुलायम त्वचा मिळवण्यासाठी रोजच्या जेवणातील कढीपत्ता गुणकारी आहे. कढीपत्त्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होते.

Shreya Maskar

खाण्याची चव वाढवण्यासोबतच निरोगी त्वचा मिळवण्यासाठी कढीपत्ता उपयोगी ठरतो. कढीपत्ता अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्माने युक्त असल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास कढीपत्ता मदत करतो. ज्यामुळे त्वचा तजेलदार होते. चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या, काळे डाग, लाल चट्टे दूर करण्यासाठी कढीपत्ता गुणकारी आहे.

कढीपत्त्याचे पाणी

तुम्ही चेहरा धुवण्यासाठी कढीपत्त्याचे पाणी वापरू शकता. कढीपत्त्याच्या पाण्याने चेहऱ्या धुतल्यास त्वचेचे आरोग्य चांगले राहते. कढीपत्त्याचे पाणी बनवण्यासाठी कढीपत्त्याची पानं उकळवून घ्या. हे पाणी थंड झाल्यावर यांनी चेहरा स्वच्छ धुवा.

बहुगुणी कढीपत्ता

  • कढीपत्ता थंड पदार्थ असल्यामुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मोठा उपयुक्त आहे.

  • चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पानं उकळून त्या पाण्याची नियमित वाफ घ्या.

  • त्वचेवर लाल चट्टे असल्यास कढीपत्त्याच्या पाण्याने अंघोळ करा.

  • कढीपत्त्याचे सेवन केल्यास त्वचेची पोत सुधारते. त्वचा चमकदार आणि मुलायम होते.

  • तेलकट त्वचेसाठी कढीपत्त्याचा फेसपॅक रामबाण उपाय आहे.

  • कढीपत्त्याचा फेसपॅक चेहऱ्याला ओलावा देत असल्यामुळे चेहरा मॉइश्चराईज होतो.

  • डोळ्याखाली काळे डाग आल्यास कढीपत्त्याची पानं ठेवावी. त्यामुळे डोळ्यांखालील त्वचा सुधारते.

कढीपत्ता- दही फेसपॅक

त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कढीपत्त्याचा फेसपॅक तयार करू शकता. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होईल. कढीपत्त्याचा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम ताजी कढीपत्त्याची पाने उकडून घ्या. ही पाने थंड झाल्यावर कुस्करून करून त्यामध्ये दही आणि मध घाला. सर्व मिश्रण छान एकत्र करून फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक २५ ते ३० मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. चेहरा सुकल्यावर कोमट पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून तीन ते चार वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स कमी होते.

कढीपत्ता-मुलतानी माती फेसपॅक

आयुर्वेदामध्ये हळद आणि मुलतानी मातीला खूप महत्त्व आहे. बॅक्टेरियल इंफेक्शन होऊ नये म्हणून यांचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील काळे डाग दूर तसेच सुरकुत्या कमी करण्यासाठी हा फेसपॅक उत्तम आहे.कढीपत्ता-मुलतानी माती फेसपॅक बनवण्यासाठी कढीपत्त्याची पानं एक तास भिजवून मिक्सरला छान वाटून घ्या. त्यामध्ये मुलतानी माती, हळद, गुलाबपाणी मिक्स करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे ठेवून चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT