Spectacle Marks : चष्म्यामुळे नाकावर काळे डाग पडलेत? आजपासूनच सुरु करा 'हे' उपाय, काळे डाग होतील दूर

Spectacle Marks Tips : चष्म्यामुळे नाकावर काळे डाग पडतात. तर खालील टिप्स फॉलो करा आणि चेहऱ्याचे सौंदर्य जपा.
Spectacle Marks Tips
Spectacle MarksSAAM TV
Published On

आजकाल तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे लोकांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. चष्म्यांच्या विविध व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. पण सतत चष्मा घातल्यामुळे नाकावर काळे डाग पडतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. याचे नेमके कारण असे की, चष्म्यावरील नाकाचा स्टँड आपल्या नाकावर चिकटून राहतो. त्यामुळे नाकाच्या त्वचेवर दबाव पडतो. या दाबामुळे नाकाचे रक्ताभिसरण थांबून तेथील त्वचा मृत होते. परिणामी नाकावर काळे डाग पडू लागतात. हेच चष्म्यामुळे नाकावर पडणारे काळे डाग घालवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय करा.

पुदिना

पुदिना हा थंड पदार्थ आहे. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. पुदिन्याची पानं नाकावर चष्म्यामुळे निर्माण झालेल्या काळ्या डागांवर चोळावी. त्यामुळे काळे डाग निघून जाण्यास मदत होते.

पपई

पपईमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे काळ्या डागांवर फायदेशीर ठरतात. त्यामुळे कच्चा पपई छान कुस्करून काळ्या डागांवर लावा आणि पपई सुकल्यावर चेहरा स्वच्छ करा.

संत्री

चष्म्यामुळे पडणारे काळे डाग घालवण्यासाठी संत्र्याची साल बारीक करून त्यामध्ये दूध आणि हळद मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट नियमित काळ्या डागांवर लावल्यास डाग निघून जाण्यास मदत होते.

बदाम

रोज बदामाचे तेल नाकावर असेलेल्या काळ्या डागांवर लावून मालिश करा. त्यामुळे त्वचा मुलायम होते आणि डाग कमी होतात.

टॉमेटो

टॉमेटोमधील पोषक घटक चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात. आठवड्यातून २-३ वेळा टॉमेटोची साल काळ्या डागांवर घासल्यास त्वचा पूर्ववत होण्यास मदत होते.

मध

मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट्स हे दोन्ही गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. नियमित रात्री झोपताना नाकावरील डागांवर मध चोळावे. डागांचा काळेपणा हळूहळू कमी होतो.

बटाटा

प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असलेला बटाट चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यास रामबाण उपाय आहे. कच्च्या बटाट्याचा रस काळ्या डागांवर लावा. काही दिवसात नाकावरील काळा डाग कमी होईल.

गुलाबपाणी

रोज रात्री झोपताना गुलाबपाणी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. गुलाबमधील पोषक घटक चेहऱ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

काकडी

चष्म्यामुळे उमटणारे काळे डाग कमी करण्यासाठी थंड काकडीच्या चकत्या नाकावर ठेवाव्यात.

Spectacle Marks Tips
Hair Care : आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत...

कोरफडी

नियमित रात्री झोपताना नाकाच्या दोन्ही बाजूंना कोरफडीचा गर लावून झोपावे आणि सकाळी उठून चेहरा स्वच्छ करावा.

लिंबू

लिंबाची साल चष्म्यामुळे उमटलेल्या काळ्या डागांवर चोळावी. थंडपाण्याने चेहरा स्वच्छ करावा.

चष्म्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी?

  • चष्मा काढताना आणि घालताना दोन्ही हातांचा वापर करावा. त्यामुळे एकाबाजूला जोर पडत नाही.

  • नाकाला घट्ट बसेल असा चष्मा खरेदी करू नये. यामुळे मोठ्या प्रमाणात नाकावर डाग पडतात.

  • वाकडा, खाली घसरणारा चष्मा त्वरित चष्म्याच्या दुकानात जाऊन दुरुस्त करून घ्यावा.

  • उत्तम दर्जाचा चष्म्याचा धातू निवडावा.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Spectacle Marks Tips
Night Shift Side Effects : नाईट शिफ्ट केल्याने तुम्हालाही होऊ शकतात 'हे' आजार; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com