After Facial Care Tips: फेशियल केल्यानंतर चुकूनही करु नका या चुका; त्वचेला सतत सुटेल खाज, येतील रॅशेस

Post Facial Skin Care Tips in Marathi: फेशियल केल्यानंतर अनेक स्त्रियांना चेहऱ्यावरील पुरळ, मुरुमे आणि खाज सुटणे यांचा त्रास होतो. जर तुम्ही देखील नुकतेच फेशियल केले असेल तर या पद्धतीने त्वचेची काळजी घ्या.
Facial Care Tips in Marathi
Facial Care Tips in MarathiSaam tv

Mistake To Avoid After Facial:

अनेक स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी त्वचेला काहींना काही लावत असतात. लग्न किंवा पार्टीत जाण्यासाठी आपण अनेक मेकअप किटचा समावेश करतो. त्यात अनेक केमिकल उत्पादनांचा वापर करुन चेहऱ्यावर ग्लो आणायचा प्रयत्न करतात. अनेकदा पार्लरमध्ये गेल्यानंतर आपण फेशियल करतो.

फेशियलमुळे चेहरा तजेलदार दिसतो तसेच वाढत्या वयाचे परिणाम कमी करण्यासाठी हे प्रभावी मानले जाते. फेशियल केल्यानंतर अनेक स्त्रियांना चेहऱ्यावरील पुरळ, मुरुमे आणि खाज सुटणे यांचा त्रास होतो. जर तुम्ही देखील नुकतेच फेशियल केले असेल तर या पद्धतीने त्वचेची काळजी (care) घ्या.

Facial Care Tips in Marathi
Acne Skin Care : त्वचेवरील मुरुमांनी वैतागले आहात? सतत चेहऱ्याला खाज सुटते? स्किन केअर टीप्स फॉलो करा

1. चेहरा धुवू नका

फेशियल केल्यानंतर दिवसभरात चेहऱ्यावर फेसवॉश किंवा साबणाचा वापर टाळा. चेहऱ्या धुण्यासाठी पाण्याचा वापर करा.

2. सूर्यप्रकाश

फेशियल केल्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा. फेशियल केल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडतात. सूर्याच्या किरणांमुळे ऍलर्जी होण्याची शक्यता असते. उन्हात बाहेर जात असेल तर चेहरा व्यवस्थित झाका.

Facial Care Tips in Marathi
Hair Mask : केस विंचरताना तुटतात? रुक्ष झालेत? हा हेअर मास्क ट्राय करा, केस होतील दाट-मजबूत

3. मेकअप करु नका

लग्न किंवा पार्टीत जाताना फेशियल करत असाल तर दोन दिवसाआधी करा. त्याच दिवशी फेशियल आणि मेकअप केल्याने चेहऱ्यावर मुरुमे येतात. फेशियल केल्यानंतर त्वचेची छिद्रे उघडतात. जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा ही केमिकल उत्पादने त्वचेमध्ये शोषली जातात. ज्यामुळे पुरळ येणे, खाज सुटणे यांसारख्या समस्येला सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com