कडक उन्हामुळे आपल्या आरोग्यासह त्वचेवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. उष्णतेमुळे खूप घाम येतो. त्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात.
त्वचेच्या (Skin) मृत पेशी आणि घामामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. तसेच सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे जळजळ आणि सनबर्न होण्याचा धोकाही अधिक असतो. जर तुमची त्वचा तेलकट होत असेल आणि त्यावर सतत पुरळ येत असतील तर उन्हाळ्यात (Summer Season) अधिक त्रास होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी (Care) कशी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
1. डबल क्लेंजिंग
उन्हाळ्यात आपण सतत सनस्क्रिन लावतो, अनेक सीरम लावतो, जे क्लीन्सरने स्वच्छ केले जात नाही. यामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. ज्यामुळे त्वचेवर पुरळे येतात. यासाठी त्वचेला नियमित स्वच्छ करा. चेहऱ्यावरील मेकअप करण्यासाठी सनस्क्रीन तेल आधारिक क्लिंझरने काढा. नंतर फोमिंग किंवा जेल आधारित क्लिंझरने तुमचा चेहरा स्वच्छ करा.
2. मॉइश्चरायझर
त्वचा सतत तेलकट होते म्हणून अनेकजण मॉइश्चरायझर करत नाही. परंतु, यामुळे त्वचा अधिक तेल तयार करु लागते. ज्यामुळे मुरुमांचा धोका वाढतो. यासाठी जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसेल.
3. एक्सफोलिएट
उन्हाळ्यात घामामुळे आणि मृत पेशींमुळे छिद्रे अडकू लागतात. यासाठी त्वचेवरील छिद्र स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करा. तुम्ही केमिकल पीलचा वापर करु शकता. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि त्वचेमध्ये जमा झालेली घाण साफ करते.
4. सनस्क्रिन
सनस्क्रिन तुमच्या त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचवते. सूर्यप्रकाशामुळे मुरुमांची जळजळ वाढू शकते. त्यामुळे त्वचेवर काळे डागही येऊ शकतात. त्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रिन लावायला विसरु नका.
5. भरपूर पाणी प्या
उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. ज्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवते. त्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.