Skincare Tips : महागड्या कॉस्मेटिक्सना करा टाटा,बाय-बाय! फळांच्या सालीने बनवा त्वचेसाठी गुणकारी फेसपॅक

Fruit Peel Face Mask : चेहऱ्याचे आरोग्य जपण्यासाठी महागड्या कॉस्मेटिक्सचा वापर करणे टाळा. पौष्टिक फळांच्या सालीपासून फेस पॅक बनवा आणि चेहऱ्याचे सौंदर्य जपा.
Fruit Peel Face Mask
Skincare TipsSAAM TV

आपली त्वचा निरोगी आणि मुलायम राहावी असे सर्वांना वाटते. त्यासाठी आपण चेहऱ्यावर विविध महागडे कॉस्मेटिक्स लावतो. कधीकधी या कॉस्मेटिक्समुळे सुद्धा चेहऱ्याला ॲलर्जी होऊन चेहऱ्याचे आरोग्य धोक्यात येत. तसेच आपल्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या चेहऱ्यावर परिणाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात, सुरकुत्यांचे प्रमाण वाढते, डोळ्यांखाली काळे डाग येतात. अशा परिस्थितीत त्वचेच्या सौंदर्य टिकवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करा.

फळांच्या साली आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यामुळे चेहऱ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचा चमकदार बनवण्यासाठी घरी ट्राय करा फळांच्या सालीपासून फेसपॅक. जे चेहऱ्याचे आरोग्य अजून सुंदर करेल.

काकडीच्या सालीचा फेसपॅक

काकडी चेहऱ्याला थंडावा देऊन त्वचेतील तेल कमी करते. काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी काकडी आणि लिंबाची साल बारीक पेस्ट करून घ्यावी. या पेस्टमध्ये दही घालून छान मिक्स करून घ्यावे. हा फेसपॅक चेहऱ्यावर २० ते २५ मिनिटे लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. दह्यामध्यील अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म चेहरा निरोगी ठेवण्यास मदत करतात. हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी उत्तम आहे.

केळीच्या सालीचा फेसपॅक

केळीच्या सालीमधील नैसर्गिक तेल त्वचेचा कोरडेपणा दूर करतात. हा फेसपॅक बनवण्यासाठी ॲव्होकॅडो आणि केळीची साल बारीक पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये थोडे मध घालून छान मिक्स करा. तयार झालेला फेसपॅक २५ ते ३० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. मास्क सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. कोरड्या त्वचेसाठी हा फेसपॅक उत्तम आहे.

Fruit Peel Face Mask
Upper Lips and Forehead : फोरहेड आणि अप्पर लिप्ससाठी आता पार्लरमध्ये जाण्याची झंझट मिटली; घरीच ट्राय करा 'हा' उपाय

गाजरच्या सालीचा फेसपॅक

गाजरमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म चेहऱ्याची पोत सुधारण्यासाठी मदत करतात. तर बटाट्याची साल त्वचा उजळण्याचे काम करते. मिक्सरमध्ये गाजर आणि बटाट्याची साल चांगली वाटून घ्यावी. या पेस्टमध्ये थोडे दही घालावे आणि ही पेस्ट चेहऱ्यावर २० ते २५ मिनिटे लावून कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.

पपईच्या सालीचा फेसपॅक

पपईची साल चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पपईच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. एका भांड्यात पपईची बारीक चिरलेली साल , चंदन पावडर, गुलाबपाणी, कोरफडीचा रस घेऊन सर्व छान मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे आणि थंड पाण्याने चेहरा धुवावा.

हे सर्व फेसपॅक लावल्यावर चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला मॉइश्चरायझर करायला विसरू नये.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Fruit Peel Face Mask
Beauty Tips : तुम्ही म्हातारपणातही दिसाल तरुण, 'या' 6 पदार्थाचं करा सेवन!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com