Pimple Free Skin: चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी दालचिनीचा 'हा' फेसपॅक नक्की लावा; चेहरा होईल तजेलदार

Skin Care: सध्या बदलती जीवनशैली आणि धुळीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्स दूर करण्यासाठी दालचिनी प्रभावी आहे. दालचिनीचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दू होतात.
Pimple Free Skin
Pimple Free SkinSaam Tv
Published On

सध्या बाहेरील प्रदुषित वातावरण आणि धुळीमुळे शरीरासोबतच चेहऱ्यावर वाईट परिणाम होतो. धुळीमुळे चेहऱ्याला पिंपल्स येतात. पिंपल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे चेहऱ्याची विशेष काळजी घ्यायला हवी. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी फायदेशीर आहे. दालचिनी ही जेवणात वापरली जाते. परंतु जेवणासोबतच चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी दालचिनी मदत करते. दालचिनी चेहऱ्यावरील बॅक्टेरियापासून संरक्षण करते. दालचिनी अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतात.

Pimple Free Skin
Lip Care Tips: सावधान! ओठांचं सौंदर्य वाढवणारी लिपस्टिक ठरू शकते घातक, 'अशी' घ्या काळजी..

पिंपल्स दूर होतात

जर तुमच्या चेहऱ्यावर नेहमी पिंपल्स येत असतील तर तुमच्या स्किन केअरमध्ये दालचिनीचा वापर करा. दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. दालचिनीची पावडर आणि तेल दोन्ही गोष्टी त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

दालचिनीचा अशा प्रकारे वापर करा

सर्वप्रथम दालचिनीच्या तेलाचे २-३ थेंब घ्या. त्यात १ चमचा मध मिसळून ते चेहऱ्याला लावा. काही वेळाने चेहरा धुवून टाका. काही दिवस हे सातत्याने केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतील.

याचसोबत तुम्ही दालचिनी पावडर आणि मध एकत्र मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा. १० मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

Pimple Free Skin
Palak Idli Recipe: एकदम पौष्टिक नाश्त्याला बनवा साउथ स्टाईल पालक इडली; लहान मुले आवडीने खातील, सोपी रेसिपी वाचा

सुरकुत्यांपासून संरक्षण दालचिनीतील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म रॅडिक्सल्सपासून होणारे नुकसान टाळतात. दालचिनी कोलेजन निर्माण करते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी प्रमाणात येतात. त्यामुळे त्वचेची चमक वाढते. यासाठी सर्वप्रथम दालचिनी पावडर बनवा. त्यात ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुवा. चेहरा उजळेल दालचिनी चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यास मदत करते. दालचिनीमुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.त्यामुळे चेहरा सुंदर दिसतो. दालचिनीमुळे खडबडीत किंवा निस्तेज त्वचा चमकदार दिसते. यासाठी दालचिनी पावडर घ्या. त्यात दही आणि मध मिक्स करा. त्याची पेस्ट करु घ्या. १५ मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com