Beauty Tips : तुम्ही म्हातारपणातही दिसाल तरुण, 'या' 6 पदार्थाचं करा सेवन!

Beauty Tips In Marathi : संतुलित आहार घेतल्यास शरीर निरोग राहतं. आपल्या आहारात फळं, हिरव्या पालेभाज्या असणं आवश्यक आहे. आहार नेहमी जीवनसत्त्वांनी समृद्ध असावा.
Beauty Tips In Marathi
Beauty TipsSaam TV
Published On

प्रत्येकाला आपण कायम तरूण दिसावं असं वाटतं पण सध्या अकाली वृद्धत्वाच्या समस्या वाढल्या आहेत. या लक्षणांना कारणीभूत ठरणाऱ्या अनेक गोष्टींचा आपण विचारच करत नाही त्यामुळे अशा समस्या निर्माण होतात. आपण आपल्या आहारात काय खातो या एकाच गोष्टीकडे आपण लक्ष दिल्यास शरीराच्या अनेक समस्या तसंच अकाली वृद्धत्वाच्या समस्या नाहीशा होतील.

Beauty Tips In Marathi
Healthy Foods: पंचविशीनंतर मुलींनी खा हे सुपरफूड्स, राहाल फीट अँड फाईन

संतुलित आहार घेतल्यास शरीर निरोग राहतं. आपल्या आहारात फळं, हिरव्या पालेभाज्या असणं आवश्यक आहे. आहार नेहमी जीवनसत्त्वांनी समृद्ध असावा. हिरव्या भाज्या आणि फळांचा आपल्या आहारात समावेश केल्यास निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. वाढत्या वयानुसार त्वचेचा ग्लो, लवचीकता कमी होते. या समस्या दूर करण्यासाठी आणि शरीराला कायम तरूण ठेवण्यासाठी हे सहा पदार्थ फायदेशीर ठरू शकतात.

हे खाल्यास दिसाल वयापेक्षा लहान!

आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर असते. त्यामुळे दररोज एक आवळा खाल्ल्यास त्वचा उजळते तसंच रक्त शुद्ध होतं. रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. व्हिटॅमिन 'सी'च्या सर्वोच्च स्त्रोतांपैकी एक म्हणजे आवळा त्यामुळे दृष्टी सुधारण्यासही मदत होते.

टोमॅटो

टोमॅटो खाल्ल्यामुळे शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. टोमॅटोमुळे आपली स्किन चमकदार होण्यास मदत होते. टोमॅटो तुम्ही चेहऱ्यावर देखील लावू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठीही टोमॅटो फायदेशीर ठरतो.

काकडी

काकडी तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. काकडी शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते. काकडीमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन डी यासारखी पोषक तत्वं असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहतं. तसंच काकडी डोळ्यांवर ठेवल्यानं काळी वर्तूळही कमी होण्यास मदत होते.

सफरचंद

Eat Apple a day keeps doctor away असे म्हटले जाते इतकं सफरचंदाचं महत्व आहे. रोज एक सफरचंद खाल्यानं त्वचा उजळते तसंच निरोगी आणि चमकदार त्वचा होते. सफरचंदामुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग नाहीसे होतात. सर्वात महत्वाचं म्हणजे सफरचंदाचं सेवन केल्यानं चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात.

केळी

केळी खाल्यानं तणाव कमी होते, वजन वाढवण्यासाठी तसचं अशक्तपणा दूर करण्यासाठीही केळी फायदेशीर ठरते. चेहऱ्यावर केळीची साल चोळल्याने चेहरा उजळतो. रोज एकं केळी खाल्यानं त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो ज्यामुळे तुम्ही तजेलदार दिसाल.

कलिंगड

कलिंगडाचं सेवन केल्यानं केसांच्या वाढीस मदत होते. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे हिरड्या निरोगी राहतात. रोज कलिंगड खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात तसचं शरीर हायड्रेड राहतं. कलिंगड खाल्यानं कोरड्या ओठांची समस्याही दूर होते. कलिंगडात सुमारे 92 टक्के पाणी असतं ज्यामुळे त्वचा उजळ होते.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Beauty Tips In Marathi
Foods for Blood Preassure: 'या' पदार्थांचे सेवन केल्यास तुमचा रक्तदाबाचा त्रास होईल दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com