Watermelon Peel Recipes : आता कलिंगडाचं साल टाकणं टाळा अन् बनवा 'हे' ३ स्वादिष्ट पदार्थ

Watermelon Peel Recipes : खूप जण कलिंगड आवडीने खातात मात्र त्याची साल टाकून देतात. पण असे करणे खूप चूकीचे आहे. कलिंगडाच्या सालीमध्येही खूप पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.
Watermelon Peel Recipes
Watermelon Peel RecipesSaam Digital
Published On

कलिंगड हे अनेकांचे आवडते थंडगार फळ आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लोक कलिंगडाचा आस्वाद घेतात. बाहेरच्या कडक उन्हापासून पोटाला थंडावा देण्याचे काम कलिंगड हे फळ करते. कलिंगडामध्ये ९० टक्क्यांहून जास्त पाणी असते. ज्यामुळे शरीराला दीर्घकाळ हायड्रेट राहते. खूप जण कलिंगड आवडीने खातात मात्र त्याची साल टाकून देतात. पण असे करणे खूप चूकीचे आहे. कलिंगडाच्या सालीमध्येही खूप पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे यापुढे कलिंगडाची साल टाकून न देता त्यापासून हे ३ चविष्ट पदार्थ बनवा.

चवदार हलवा

कलिंगडाच्या सालीपासून चवदार हलवा तयार करता येते. हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कलिंगडाचा हिरवा भाग काढून सालीचे छोटे भाग करून थोडे जाडसर वाटून घ्या. यानंतर पॅनमध्ये तूप घालून तुमच्या आवडीनुसार सुखामेवा भाजून घ्यावा आणि मग त्यामध्ये कलिंगडाच्या सालीची पेस्ट घालून छान मंद आचेवर मिश्रण परतून घ्यावे. छान पाणी सुटू लागल्यावर त्यामध्ये साखर आणि थोडा कलिंगडाचा रस घालावा. हे सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत छान ढवळत राहा. अशाप्रकारे तुमचा कलिंगडाच्या सालीचा चवदार हलवा तयार झाला आहे.

स्वादिष्ट जॅम

कलिंगडाच्या सालीच्या मदतीने तुम्ही जॅम देखील तयार करू शकता. सर्वप्रथम कलिंगडाच्या सालीचे आणि सफरचंदाचे बारीक तुकडे करून घ्यावे. त्यानंतर एका पॅनमध्ये कापलेले फळाचे आणि सालीचे तुकडे घालून त्यामध्ये साखर, लिंबाचा रस आणि व्हॅनिला इसेन्स घालावा. हे सर्व मिश्रण जॅमसारखे घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. थोड्यावेळाने तयार झालेला जॅम थंड होण्यासाठी एअर टाईट जारमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.

Watermelon Peel Recipes
Loan Fraud: तुमच्या नावावर दुसऱ्याने कर्ज घेतलंय का? लोन न घेता तुम्ही कर्जबाजारी आहात? अशाप्रकारे करा चेक

चटपटीत चटनी

कलिंगडाच्या सालीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कलिंगडाच्या सालीचा हिरवा भाग काढून ती साल बारीक चिरून घ्यावी. त्यानंतर एका पॅनमध्ये बारीक चिरलेली कलिंगडाची साल, साखर, मीठ, काळी मिरी आणि थोडे आले घालून मंद आचेवर शिजवा. यामुळे चटनी पॅनला चिकटणार नाही आणि जळणारही नाही. तसेच यामध्ये तुमच्या आवडीनुसार इतर तिखट मसाले देखील तुम्ही टाकू शकता. हे मिश्रण सतत ढवळत राहा. आता अशाप्रकारे तुमची कलिंगडाच्या सालीची चटणी तयार झाली आहे. ही चटणी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला आठवडाभर याचा आस्वाद घेता येईल.

Watermelon Peel Recipes
Loan Fraud: तुमच्या नावावर दुसऱ्याने कर्ज घेतलंय का? लोन न घेता तुम्ही कर्जबाजारी आहात? अशाप्रकारे करा चेक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com