Summer skin Care: गावी गेल्यावर तुमचाही चेहरा काळा पडलाय? काकडी ठरेल रामबाण उपाय

Cucumber Facepack For Skin Care: उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी हिवाळ्यात थंड पदार्थ खायचे असतात. हिवाळ्यात काकडी खाणे खूप फायदेशीर असते. खाण्यासोबतच चेहऱ्यासाठीदेखील काकडी खूप चांगली असते.
Summer skin Care
Summer skin Caregoogle

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी हिवाळ्यात थंड पदार्थ खायचे असतात. हिवाळ्यात काकडी खाणे खूप फायदेशीर असते. खाण्यासोबतच चेहऱ्यासाठीदेखील काकडी खूप चांगली असते. काकडी तुमच्या चेहऱ्याला थंडावा देते. त्यामुळे पिंपल्स, मुरुम, सन टॅनिंग होत नाही. आज आम्ही तुम्हाला काकडीचा फेसपॅक कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

फेसपॅक असा बनवा

काकडी, पुदीना आणि डिस्टिल्ड वॉटर

सर्वप्रथम काकडीचे ४-५ तुकडे करा. त्यानंतर डिस्टिल्ड वॉटर आणि पुदिन्याचे पाने एका डब्यात बंद करा. हे पाणी जवळपास एक तास फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर हे पाणी गाळून घेऊन एका स्प्रे बॉटलमध्ये ठेवा. हे पाणी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून वापरु शकतात. हे पाणी वापरल्याने उन्हात त्वचा थंड आणि तजेलदार राहते.

काकडी, लिंबू, अॅलोवेरा जेल आणि गुलाबपाणी

सर्वप्रथम काकडीचे लहान तुकडे करुन ते मिक्सरमध्ये बारीक करा. त्यानंतर हे मिश्रण मलमलच्या कपड्यातून गाळून घ्या. यात १ चमचा गुलाबपाणी, अॅलोवेरा जेल आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे मिक्षण स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि फ्रिजरमध्ये ठेवा. हे पाणी तुम्ही चेहऱ्यासाठी वापरु शकतात.

Summer skin Care
Air Cooler Precautions : कुलर वापरताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा तुमच्यावरही ओढावू शकतं संकट

काकडी आणि नारळपाणी

सर्वप्रथम काकडीचे १०-१५ तुकडे किसून घेऊन त्याचा रस काढा. हा रस २०-२५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर त्यात १ कप नारळाचे पाणी मिसळा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये ठेवा. हे पाणी स्किन टोनरचे काम करेन. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि फ्रेश राहील.

Summer skin Care
Reduce Bad Cholesterol : ऑपरेशन न करता कोलेस्ट्रॉल गायब होणार; सकाळी उपाशीपोटी खा 'हे' पदार्थ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com