ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुदिना ही एक औषधी वनस्पती आहे.
उन्हाळ्यात पुदिन्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पुदिन्यात विटामिन ए, विटामिन सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम,अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात.
पुदिन्यातील गुणधर्मामुळे मळमळ, मोशन सिकनेस यांपासून आराम मिळतो.
पुदिन्यातील मेन्थॉल आणि रोझमॅरेनिक अॅसिड सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे अॅसिडिटी, जळजळ होत नाही.
पुदिन्यातील विटामिन ए, सी आणि लोह रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते.
पुदिन्यातील मेन्थॉल श्वसन प्रणालीला निरोगी ठेवते. यामुळे खोकला, घशाचे आजार कमी करण्यास मदत होते.
पुदिन्याचे पाणी बनवण्यासाठी एक बाटलीत २० ते २० पाने टाका. रात्रभर हे पाणी असेच राहू द्या. त्यानंतर सकाळी उठून हे पाणी प्यावे.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.