Pitru Paksha 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Pitru Paksha 2024: पितृपक्षातील नैवेद्यासाठी खास काकडी रायता; वाचा परफेक्ट रेसिपी

Cucumber Raita Recipe for Shradh : पितृपक्षात नैवेद्याला विविध पदार्थ ठेवले जातात. यामध्ये काकडीचा रायता सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. या पदार्थाची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Ruchika Jadhav

सध्या पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षात प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबात देवाघरी गेलेल्या व्यक्तींचे स्मरण करतात. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी पूजा करतात. 17 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. तर येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष सुरू राहणार आहे. या काळात घराघरात पित्रांसाठी नैवेद्य बनवले जातात.

नैवेद्यात खीर, भाजी आणि काकडीचा रायता बनवला जातो. पितृपक्षातील नैवेद्यात हे पदार्थ सर्वधिक महत्वाचे आहेत. या पदार्थांचा नैवेद्य पितृ आणि ब्राम्हणांना देणे पवित्र आणि भाग्याचे मानले जाते. मात्र अनेक व्यक्तींना याची परफेक्ट रेसिपी माहिती नसते. त्यामुळे आज आम्ही खास तुमच्यासाठी काकडीचा रायता कसा बनवायचा याची परफेक्ट रेसिपी आणली आहे.

साहित्य

दही

गूळ

काकडी

सफेद मीठ

काळं मीठ

भाजलेलं जिरं

लाल मिरची

पाणी

काकडीचा रायता बनवण्याची योग्य पद्धत

काकडीचा रायता बनवण्यासाठी सर्वात आधी काकडी बारीक किसून घ्या. काकडी किसल्यावर यातील जास्तीचे पाणी काढून टाका. त्यानंतर दही एका सूती कापडात टाकून घ्या. सूती कापडात दही घेऊन यातील जास्तीचे पाणी काढून टाका. दह्यात अजिबात पाणी ठेवू नका.

संपूर्ण पाणी निघाल्यावर दही एका भांड्यात काढून घ्या. त्यानंतर हे दही मस्त फेटून घ्या. दही फेटत असताना यात किसलेला गूळ मिक्स करा. पुढे यामध्ये काकडी मिक्स करा. त्यानंतर चवीनुसार काळं आणि सफेद मीठ सुद्धा मिक्स करा. काळं मीठ जास्त खारट असतं त्यामुळे ते अगदी थोड्या प्रमाणात वापरा. पुढे भाजलेले जिरे आणि लाल मिरची देखील यात मिक्स करा.

तयार झाले झटपट काकडीचे रायते. जेवणात आणि महत्वाचे म्हणजे नैवेद्याच्या ताटात हा रायता नक्की ठेवा. रायता चवीला उत्तम लागतो. रायत्याची ही रेसिपी तुम्ही नैवेद्यासह अन्य जेवणावर सुद्धा वापरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT