Ruchika Jadhav
गणेशोत्सवात प्रसादासाठी आपण विविध पदार्थ बनवत असतो. त्यामध्ये यंदा तुम्ही काहीतरी वेगळं म्हणून फ्रुट्स कोशिंबीर बनवू शकता.
फ्रुट्स कोशिंबीर बनवताना तुम्हाला सर्व पिकलेली पळे घ्यावी लागतील.
केळी अननस अशी मऊ फळे बारीक चॉपकरून मिक्स करा. तर काकडी, बिट, गाजर किसनीवर बारीक किसून घ्या.
फळांची कोशिंबीर बनवताना घरी बनवलेल्या दह्याचा वापर करा. या दह्यातील जास्तीचे पाणी एका कापडाच्या सहाय्याने गाळून घ्या.
दह्यामध्ये अजिबात साखरल मिक्स करू नका. यामध्ये फक्त मध मिक्स करून घ्या.
फ्रुट कोशिंबीर आणखी टेस्टी होण्यासाठी यामध्ये अंजिर आणि अन्य फळे मिक्स करून घ्या.
अगदी पाव कप दूध किंवा दूध पावडर यात मिक्स करा. तसेच चिया सिड्स आणि फळांच्या बिया सुद्धा मिक्स करून घ्या.