आखातातील युद्धामुळे देशात एलपीजीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. या संकट काळातच एलपीजीला पर्याय ठरू शकणारे स्वदेशी इंधन तयार करण्यात पुण्यातील एनसीएल म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना यश आलंय.
डीएमई म्हणजे ‘डाय मिथिल इथर’ असं त्याचं नाव आहे. ‘डीएमई’च्या रासायनिक प्रक्रियेसाठी आवश्यक संप्रेरक ‘एनसीएल’ने विकसित केला आहे. ‘डीएमई’चा इंधन म्हणून स्वतंत्रपणे, तसेच ‘एलपीजी’मध्ये मिश्रण करून वापर शक्य आहे. विशेष म्हणजे ‘डीएमई’च्या प्रायोगिक तत्त्वावरील व्यावसायिक उत्पादनासाठी पाऊल उचलण्यात आलंय. यामुळे भारताची गॅस आयात कमी होईल. साम टीव्हीच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष एनसीएलमध्ये जाऊन याचा आढावा घेतलाय.
LPGला मिळाणार स्वदेशी पर्याय ! (सिलेंडर आणि NCL चा लोगो लावा)
देशातच तयार होणार LPGला पर्याय असणारे DME(डाय मिथील इथर)
पुण्याच्या NCLने 2004 पासूनच्या संशोधनानंतर विकसित केलं DME इंधन
DME इंधन स्वतंत्रपणे LPGमध्ये मिसळून स्वयंपाक, वाहनांसाठी वापरता येणार
पारंपरिक LPGच्या तुलनेत दीडपट अधिक ऊर्जा देणारे प्रभावी इंधन
पिरंगुटमध्ये दिवसाला 250 किलो क्षमतेचा प्रायोगिक प्रकल्प उभारणार
वर्षाला 2.1 कोटी मेट्रीक टन LPGची आयात कमी करण्यासाठी मदत होणार
जैवइंधनापासून मिथेनॉल तयार करून त्यावर पुढे रासायनिक प्रक्रियेतून ‘डीएमई’ मिळते. या रासायनिक प्रक्रियेसाठीचा विशेष घटक ‘एनसीएल’मध्ये विकसित करण्यात आला. त्यानंतर ‘एनसीएल’मध्ये 12 किलोग्रॅम प्रतिदिन उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले. आता हे तंत्रज्ञान उद्योगाला हस्तांतरित करून व्यावसायिक पद्धतीने उत्पादन शक्य होणार आहे. ‘एनसीएल’च्या संचालकांनी साम टीव्हीला काय माहिती दिली पाहूया....
भारताला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सर्वच क्षेत्रात होतोय. आता एनसीएल शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनातून एलपीजीवर पर्याय शोधून काढला असला तरी तो सामान्यांपर्यंत कधी पोहचणार आणि तो त्यांना परवडणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.