Modak Perfect Recipe : मोदकाला आकार आणि कळ्या पाडता येत नाहीत? 'या' पद्धतीने कणीक मळा

Ganeshotsav 2024 : मोदक बनवत असताना तुटतात. त्यामुळे कणीक मळताना कोणती काळजी घेतली पाहिजे याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
Ganeshotsav 2024
Modak Perfect RecipeSaam TV
Published On

सध्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अशात बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज देखील झाले आहेत. गणपती घरी आल्याने प्रत्येकाच्या घरात मोदक बनवले जातात. मोदक घरामध्ये प्रत्येकाला आवडतात. मऊ लुसलुशीत आणि कळ्या असलेले मोदक तुम्हाला सुद्धा फार आवडत असतील. आता मोदक बनवणे तितके कठीण नाही, मात्र अनेक व्यक्तींना मोदकाला हवा तसा आकार आणि कळ्या पडता येत नाहीत.

मोदक बनवत असताना अचानक ते तुटतात. किंवा त्याला कळ्या पडत नाहीत. आता छान कळ्या याव्यात आणि तुमचा मोदक सर्वात मस्त दिसावा यासाठी आम्ही मोदकांची परफेक्ट रेसिपी आणली आहे. यामध्ये मोदक बनवण्यासाठी सर्वात महत्वाची असलेली कणीक कशी तयार करायची याची माहिती सांगण्यात आली आहे.

Ganeshotsav 2024
Ganesh Utsav 2022 : रस्त्यांवर खड्डे खाेदल्यास गुन्हा दाखल करु; गणेशाेत्सव मंडळांना प्रशासनाचा इशारा

साहित्य

आंबेमोहोर तांदूळ

दूध

तूप

पाणी

कृती

सर्वात आधी कणीक मळण्यासाठी एका भांड्यात आंबेमोहर तांदूळ भिजत ठेवा. तांदूळ किमान ३ तास तरी भिजले पाहिजे. ३ तास पूर्ण झाल्यावर सर्व तांदळामधील पाणी गाळून घ्या. पाणी गाळून झाल्यावर हे तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्या. तांदूळ बारीक केल्यावर याचे मिश्रण एका गाळणीच्या सहाय्याने गाळून सुद्धा घ्या. मिश्रण गाळून घेतल्याने यातील बारीक सर्व कण निघून जातील आणि फक्त बारीक पीठ उरेल.

पुढे या मिश्रणात दूध आणि तूप मिक्स करून घ्या. तसेच गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. मिश्रणात तांदूळ असल्याने ते घट्ट होण्यास सुरूवात होते. मिश्रण छान घट्ट होत असताना लाटण्याच्या मदतीने ते घाटून घ्या. असे केल्याने संपूर्ण पीठ छान शिजून निघेल. त्यानंतर हे पीठ एका मोठ्या ताटात काढून घ्या. तसेच थोडे थंड होऊ द्या. पीठ थोडं नॉर्मल टेंर्पेचरवर आल्यानंतर पाण्याचा आणि तुपाचा हात घेऊन मस्त मळून घ्या.

अशा पद्धतीने कणीक इतकी छान मळली जाते की एकही मोदक बनवताना तुटत नाही. पुढे मोदकात सारण भरून कळ्या पाडताना पुढील टिप्स फॉलो करा.

पिठाचा एक गोळा घ्या. पिठाचा हा गोळा सुक्क्या पिठात घोळवून घ्या.

त्यानंतर या पिठाला दोन्ही हातांच्या सहाय्याने मस्त पुरीचा आकार तयार करा.

पुरीचा आकार तयार झाल्यावर त्याला दोन्ही बोटांच्या सहाय्याने आठधी एक एक कळी करून घ्या.

कळी करताना बोटांना थोडे सुके पीठ लावा. असे केल्याने हाताला पीठ चिकटत नाही.

तसेच छान पद्धतीने संपूर्ण कळ्या तयार होतात. कळ्या तयार झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरून घ्या.

Ganeshotsav 2024
Ganesh Utsav 2024 : कोकणी स्टाइलने बनवा बाप्पाच्या प्रसादाला पंचखाद्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com