ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गणरायाच्या आगमनाला अगदी काही काळ उरला आहे. त्याच्या येण्याने घरातील वातावरण सकारात्मक होतं.
गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये उकडीचे मोदक केले जातात.
उकडीचे मोदक गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे.
परंतु, तुम्हाला माहिती आहे का उकडीचे मोदक खाल्लयामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.
उकडीचे मोदक बनवण्यासाठी तूपाचा वापर केला जातो ज्यामुळे बद्धकोष्ठताची समस्या होत नाही.
उकडीच्या मोदकांमध्ये नारळाचा वापर केला जातो ज्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते.
मोडक करताना त्यामध्ये गुळाचा वापर होतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.