Siddhi Hande
आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन उद्या होणार आहे. बाप्पाासाठी चॉकलेटचे मोदक बनवा.
चॉकलेटचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात डार्क चॉकलेट विरघळून घ्या.
यानंतर पॅनमध्ये तूप, काजू, बदाम, पिस्ता आणि नारळाचा किस एकत्रित मिक्स करा.
या मिश्रणात कडेंस्ड मिल्क टाका. हे मिश्रण घट्ट करुन घ्या.
या मिश्रणात चॉकलेट टाका त्यानंतर काहीवेळ थंड होण्यासाठी ठेवा. या मिश्रणाला मोदकाच्या साच्यात टाका.
मोदकाचा आकार दिल्यानंतर त्यावर काजू, बदाम टाकून सजवू शकतात.