Shreya Maskar
सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.
आता नियमित सकाळ- संध्याकाळी गणपती बाप्पाची आरती केली जाते. आरती केल्यावर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी कोकणातील खास पदार्थ करा.
पंचखाद्य बनवण्यासाठी काजू , सुके खोबरे , चणा डाळ, शेंगदाणे, गूळ, पाणी, वेलची पावडर, लाह्या इत्यादी साहित्य लागते.
पंचखाद्य बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅन गरम करून त्यात काजू, सुके खोबरे, चणा डाळ, शेंगदाणे टाकून छान भाजून घ्या.
आता दुसऱ्या पॅनमध्ये किसलेला गूळ आणि गरजेनुसार पाणी घालून पाक तयार करून घ्या.
तयार झालेल्या पाकात भाजलेले सर्व पदार्थ आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात तुम्ही लाह्या टाकून सर्व छान एकजीव करून घ्या.
कोकणातील खास पारंपारिक पंचखाद्यचा प्रसाद तयार झाला.